ST चालकाच्या मुलाची भरारी; ZP शाळेत शिकलेला वैभव झाला 'फ्लाईंग ऑफिसर' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

ST चालकाच्या मुलाची भरारी; ZP शाळेत शिकलेला वैभव झाला 'फ्लाईंग ऑफिसर'

eसांगली : वाळवे तालुक्यातील (valwe) मर्दवाडीचे वैभव माने (Vaibhav mane) भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसरपदी (flying officer in Indian air force) रुजू होत आहेत. संरक्षण दलाच्या सेवेत रुजू होण्यासाठी २०१७ पासून सलगपणे विविध परीक्षा देत तब्बल सातव्या प्रयत्नात ते भारतीय वायुदलाची (Indian air force) परीक्षा उत्तीर्ण झाले. वायुदलाच्या हैदराबादच्या (Haidrabad) ॲकॅडमीतील वर्षभराच्या प्रशिक्षणानंतर ते आता आसाममध्ये (Aasam) रूजू होत आहेत. मर्दवादीतील जिल्हा परिषद शाळा ते हैदराबाद एअरफोर्स ॲकॅडमी असा त्यांचा परिश्रमपूर्वक प्रवास ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी असाच आहे.

सर्वसामान्य मध्यवर्गीय कुटुंबातील मुलांचे स्वप्न एखादी नोकरी पकडून आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे असं मर्यादित असतं. त्यात गैर असं नाही. मात्र त्यातून संरक्षणदलातील अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणे तसं चाकोरीबाहेरचं. वैभव यांचे वडील भगवान एसटीत चालक (ST Driver) तर आई सुनीता गृहिणी. या दोघांनी वैभव माने यांनी सांगली (Sangli) शिक्षण संस्थेच्या तासगाव येथील दादोजी कोंडदेव सैनिक शाळेत प्रवेश घेताना ते स्वप्न पाहिले. गावातील सातवीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिकल्यानंतर ते आष्ट्याला महत्मा गांधी हायस्कूलमध्ये आणि तिथून अकरावी बारावीसाठी तासगावच्या सैनिक शाळेत शिकले. मात्र बारावीनंतर एनडीएत (NDA) जाण्‍याचे त्यांचे स्वप्न मात्र पूर्ण झाले नाही. मग पुढील पदवीच्या शिक्षणासाठी त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवीसाठी आष्ट्याच्या अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथून ते २०१७ मध्ये पदवीनंतर पुन्हा एकदा त्यांनी सेनादल नेव्ही आणि वायुदलाच्या परीक्षांसाठी प्रयत्न सुरू केले.

हेही वाचा: '2-3 मुलं जन्माला घाला, हिंदुंची लोकसंख्या कमी झाल्यासं भविष्यात मोठं संकट'

सैनिक शाळेतील दोन वर्षांमुळे या परीक्षांचे स्वरुपाबद्दल नेमका अंदाज आला होता. त्यामुळे यश सतत हुलकावणी देत असतानाही सलग सहा परीक्षा दिल्यानंतर सातव्यांदा म्हणजे फेब्रुवारी २०२० मध्ये ते वायुदलातील अधिकारीपदाची एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट ही लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर सप्टेंबरमध्ये ते मुलाखतीतही उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांची हैदराबादच्या ॲकॅडमीत रूजू झाले. नुकतेच म्हणजे गेल्या १८ डिसेंबरला प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची आसाम एअरफोर्स स्टेशनला पोस्‍टिंग झाली आहे. लवकरच ते वायुदलाच्या प्रत्यक्ष सेवेत रुजू होत आहेत. मर्दवाडी ते आसाम असा प्रवास वैभव यांची स्वप्नपूर्ती करणारा आहे. यानिमित्ताने त्यांना वायुदलातील सेवेच्या संधीची कवाडे खुली झाली आहेत. सांगलीचा एक भूमिपुत्र भारतीय वायुसेनेत अधिकारीपदी रुजू होत आहे.

'भारतीय वायुदलाच्या प्रशासकीय विभागात माझी अधिकारीपदी निवड झाली आहे. आसामधील पहिल्या पोस्‍टिंगनंतर देशाच्या कानाकोपऱ्यातील वायुदलाच्या स्टेशनमध्ये यापुढे माझे पदोन्नतीवर पोस्‍टिंग होत राहील. वायुदलातील उच्चपदावर काम करण्याचा माझा संकल्प आहे.'

- वैभव माने, फ्लाईंग ऑफिसर (भारतीय वायुदल)

हेही वाचा: CM ठाकरेंच्या हस्ते 'व्हॉट्सअप चॅट बॉट' सुविधेचं लोकार्पण

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top