'2-3 मुलं जन्माला घाला, हिंदुंची लोकसंख्या कमी झाल्यासं भविष्यात मोठं संकट' I MP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Political

आज भारत हा हिंदूंचा बहुसंख्य देश म्हणून ओळखला जातो - मिलिंद परांडे

'2-3 मुलं जन्माला घाला, हिंदुंची लोकसंख्या कमी झाल्यासं भविष्यात मोठं संकट'

हिंदूंनी कमीत कमी तीन मुले जन्माला घालावीतच असे वागग्रस्त वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे (vishwa hindu parishad) केंद्रीय सरचिटणीस मिलिंद परांडे (milind parande) यांनी खांडव्यात केले आहे. यावेळी ते म्हणाले प्रत्येक हिंदूच्या घरात 2 ते 3 मुले असायला हवीत. या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हिंदूची (Hindu Population) लोकसंख्या कमी झाली तर भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. त्यामुळे देशातील हिंदूंनी अधिकाधिक मुले जन्माला घालायला हवीत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. (Political News) त्यामुळे आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. खांडवा (MP) येथील जुन्या धान्य मार्केट जलेबी चौकात होणाऱ्या युवक संमेलनात सहभागा दरम्यान ते बोलले आहे. संमेलनादरम्यान तरुणांना त्रिशूल दीक्षाही देण्यात आली आहे.

हेही वाचा: 'तुम्ही सगळे मरणार'; वादग्रस्त वक्तव्य प्रकरणातील कारवाईवर नरसिंहानंद संतापले

हे तर आमच्या संघर्षाचे परिणाम

यावेळी विहिंपचे मिलिंद परांडे म्हणाले, देशातील (Indian traditional) संस्कृतीवर दोन हजार वर्षांपासून सातत्याने आक्रमणे होत आहेत. त्यानंतरही आज भारत हा हिंदूंचा बहुसंख्य देश म्हणून ओळखला जातो. हे सर्व आपले आध्यात्मिक सामर्थ्य, सहिष्णुता आणि आपल्या पूर्वजांच्या कठोर संघर्षाचे परिणाम आहेत. ज्यांच्यामुळे हा इतिहास घडला आहे. जो इतिहास वाचून सतत आपल्याला पूर्वजांची गुलामगिरी जाणवत राहते, त्यांनी केलेला संघर्षाची आठवण होत राहते.

पुढे ते म्हणाले, आपल्याला पुन्हा देशाची सत्ता मिळावी, आणि आपण राज्य करावे असे देशातील एका विशिष्ट वर्गाचे स्वप्न आहे. सातत्याने ते यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचा हा हेतू आजपर्यंत पूर्ण झालेला नाही आणि भविष्यातही आम्ही तो होऊ देणार नाही. बजरंग दलाचा (Bajrang dal) प्रत्येक कार्यकर्ता आपल्या राष्ट्रासाठी (Desh news) आणि धार्मिक मूल्यांसाठी खंबीरपणे उभा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा: नन बलात्कार प्रकरणातून बिशपची निर्दोष मुक्तता

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top