esakal | स्थायी समिती सभापती पदासाठी BJP कडून निरंजन आवटींवर शिक्कामोर्तब
sakal

बोलून बातमी शोधा

nirajan aavti

स्थायी समिती सभापती पदासाठी BJP कडून निरंजन आवटींवर शिक्कामोर्तब

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाचे निवडणूक उद्या गुरुवारी होणार आहे. यासाठी भाजपकडून मिरजेचे निरंजन आवटी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्थायी समितीमध्ये भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने सभापतीपदी आवटी यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.

सांगली महापालिकेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आहे महापौरपद राष्ट्रवादीकडे असले तरी स्थायी समितीमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. महापालिकेची ही महत्त्वाची समिती ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने गेले आठ दिवस आपल्या सर्व सदस्यांना एकत्र सहलीवर पाठवले होते. हे सर्व सदस्य हैदराबाद येथे गेले होते. काल मंगळवारी या सर्वांना सोलापूरमध्ये आणण्यात आले. सायंकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सर्व सदस्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या सर्व सदस्यांशी संवाद साधल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रात्री उशिरा स्थायी सभापती पदासाठी भाजपकडून निरंजन आवटी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

हेही वाचा: Ratnagir Rain Update: कोळकेवाडीत वीजनिर्मिती बंद; संगमेश्वरात पूर

उमेदवारी निश्चित झाल्यानंतर निरंजन आवटी आणि सभागृह नेते विनायक सिंहासने आज सांगलीत दाखल झाले. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता महापालिकेत येऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महापालिकेच्या स्थायी समिती मध्ये एकूण 16 सदस्य असून यात भाजपचे नऊ, काँग्रेसचे चार राष्ट्रवादीचे तीन सदस्य आहेत. भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने सभापतीपद भाजपकडेच राहण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. मात्र काँग्रेस आघाडीचा उमेदवार आज सकाळपर्यंत निश्चित झालेला नाही.

महापौरपद राष्ट्रवादीला गेले असल्याने स्थायी समिती सभापतीपदासाठी काँग्रेसकडून उमेदवार देण्यात येणार आहे. काँग्रेसकडून यासाठी मिरजेचे करण जामदार आणि सांगलीचे फिरोज पठाण यांच्या नावाची चर्चा आहे. दुपारपर्यंत काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव निश्चित करुन अर्ज दाखल करण्यात येईल असे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी सांगितले.

loading image
go to top