पुस्तकांच्या गावात बालकुमार साहित्य संमेलनाचा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून 28 व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. या ग्रंथदिंडीत भिलार, वाई, महाबळेश्वर आणि सातारा परिसरातील शाळेतील विद्यार्थी महापुरुष, समाजसेवकांचा वेश परिधान सहभागी झाली होती.  

भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून 28 व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. या ग्रंथदिंडीत भिलार, वाई, महाबळेश्वर आणि सातारा परिसरातील शाळेतील विद्यार्थी महापुरुष, समाजसेवकांचा वेश परिधान सहभागी झाली होती.  

सकाळी भिलार जि.प. शाळेतुन ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. जि.प. केंद्र शाळा भिलार या शाळेतील विद्यार्थींनी गौरी सुतार हिच्या हस्ते पालखीतील ग्रथांची पुजा करण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, भिलारच्या सरपंच वंदना भिलारे, संमेलनाचे निमंत्रक प्रवीण भिलारे, अखिल भारतीय मराठी साहित्य संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीत बर्वे, उपाध्यक्ष माधव राजगुरु, सहकार्यवाह सुनील महाजन, समन्वय शिरीष चिटणीस, तेजस्विनी भिलारे राज्यभरातुन आलेले बालसाहित्यिक, विचारवंत, रसिक, भिलार ग्रामस्त आदी उपस्थित होते. 

ग्रंथदिंडीच्या प्रारंभी श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्याच्या वेशातील पथक, त्यानंतर ढोल- ताशा पथक, लेझीम पथक, पारंपारिक वेश परिधान केलेल्या मुलींचे पथक, मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक करणारे पथक, कलश व तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या मुलींचे पथक अशा विविध पथकांच्या माध्यमातून अक्षरशः भिलारकरांना संस्कृतीचे दर्शन घडले.           

ग्रंथदिंडी मार्गावर स्वागत करणाऱ्या आकर्षक रांगोळी काढण्यात आल्या होत्या. साहित्यिक,  रस्याच्या दुतर्फा रसिकांचे स्वागत करणाऱ्या कमानी, फलेक्स होते. ठिकठिकाणी संमेलनातील कार्यक्रमांची माहिती देणारे बॅनर लावण्यात आले होते. या ग्रंथदिंडीत परिसरातील सुमारे 15 ते 20 शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. पालखीत ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा या ग्रंथांचा समावेश होता. भिलारचे ग्रामदैवत जननीमाता मंदिराशेजारील संमेलनाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ग्रंथदिंडीचा समारोप झाला. अखिल भारतीय मराठी बालकुमार संस्थेचे हे बालकुमार संमेलन राज्य मराठी विकास संस्था आणि भिलार ग्रामपंचायतच्या सहकार्याने पार पडत आहे. त्यानंतर मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.        

सावरकर, गदिमा, स्वामी विवेकानंदाची वेशभुषा ठरले  आकर्षक 
ग्रंथदिंडीत शाळकरी मुले विनायक दामोदर, गदिमा आणि स्वामी विवेकानंदांची वेशभुषा करुन सहभागी झाले होते. त्यामुळे ही मुले रसिकांच्या कौतुकाचा विषय ठरले. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी उपस्थित गर्दी करीत होते. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माय मराठीच्या नावाच्या घोषणांनी वातावरण दणाणुन गेले. अतिशय प्रसन्न आणि उत्साही वातावरणात ही ग्रंथदिंडी पार पडली.

Web Title: Start of Balkumar Sahitya Sammelan in bhilar