बेळगावात अनोखे आंदोलन; रुग्णालयासमोर गुलाब ठेवून निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

बेळगाव  कॅण्टोन्मेंट कार्यक्षेत्राच्या कॅम्प परिसरातील खासगी रुग्णालयांना अद्याप टाळे लावण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. याप्रकरामुळे भीमसेना संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांना निवेदन देण्यात आले. याआधी कॅम्पमधील रुग्णालयाच्या दरवाजापुढे गुलाबपुष्प ठेऊन रुग्णालये सुरु करा, वैद्यकीय सेवा पुरवा याची मागणी करण्यात आली आहे.

बेळगाव ः कॅण्टोन्मेंट कार्यक्षेत्राच्या कॅम्प परिसरातील खासगी रुग्णालयांना अद्याप टाळे लावण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. याप्रकरामुळे भीमसेना संघटनेतर्फे आज (ता. 22) जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांना निवेदन देण्यात आले. याआधी कॅम्पमधील रुग्णालयाच्या दरवाजापुढे गुलाबपुष्प ठेऊन रुग्णालये सुरु करा, वैद्यकीय सेवा पुरवा याची मागणी करण्यात आली आहे.

लॉकडाउन काळातही वैद्यकीय सेवा सुविधांना वगळण्यात आले होते तरीही कॅम्पमधील अनेक रुग्णालये बंद ठेवण्यात आली होती. यामुळे येथील रुग्णालयात येणाऱ्यांचे हाल झाले. यामुळे येथील रहिवाशी व सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालये सुरु करण्याची मागणी केली. या मागणीकडे कॅण्टोन्मेंट सीईओंचेही लक्ष वेधून घेण्यात आले.

कॅम्पमधील दोघांचा मृत्यू 

कॅम्पमधील दोघांचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप आहे. कॅम्पसह शहरातील विविध दवाखाने बंद होती. त्याचा फटका बसला आणि उपचार मिळाला नाही. त्यापैकी एक पुरुष अणि एक युवती आहे. नातेवाईकांनी कॅम्पमधील डॉक्‍टरांनी सेवा न दिल्यामुळे युवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. 

कोरोना कोरोना कोरोना कोरोना कोरोना कोरोना कोरोना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Start hospitals in strike provide medical services

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: