कोल्हापूरात राज्यभरातून येणार 'ही' सुंदरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

State Level Auto Riksha Competition Kolhapur Marathi News

कोल्हापूरात राज्यस्तरीय रिक्षा सौंदर्य स्पर्धा होणार असून इच्छुक स्पर्धकांनी २५ जानेवारी पर्यंत नाव नोंदणी बंधनकारक आहे.

कोल्हापूरात राज्यभरातून येणार 'ही' सुंदरी

कोल्हापूर : निवृत्ती चौक रिक्षा मित्र मंडळातर्फे २६ जानेवारीला राज्यस्तरीय रिक्षा सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतून सर्वोत्कृष्ट रिक्षाची ‘कोल्हापूर रिक्षा सुंदरी’ म्हणून निवड केली जाणार आहे. चालकाला चांदीचे मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे. यासह ज्येष्ठ व प्रामाणि रिक्षा चालकांचा सत्कार, लकी ड्रॉ द्वारे चालकांना गणवेश वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती राजेंद्र जाधव, चंद्रकांत भोसले विजय गायकवाड, मोहन बागडी यांनी दिली. 

हेही वाचा - सांगलीचा दशरथ झाला लखपती... -


स्पर्धेचे १९ वे वर्ष आहे. निवृत्ती चौकात सकाळी १० वाजता ही स्पर्धा होणार आहे. रिक्षा मॉडेल २०१५ ते २०२० आणि २०१५ च्या आतील रिक्षा अशा दोन गटात होणार आहे. दोन्ही गटांतील अनुक्रमे पहिल्या तीन विजेत्यांस १२ हजार १२, १० हजार १० आणि ८ हजार ८ रुपये असे रोख आणि चषक देण्यात येणार आहे. तसेच दोन्ही गटातील उत्तेजनार्थास ५ हजार ५ रूपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहेत. दोन्ही गटातील प्रथम क्रमांकातून ‘कोल्हापूर रिक्षा सुंदरी’ची निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेदरम्यान दोन चाकावर आणि रिव्हर्स रिक्षा चालविण्याची प्रात्यक्षिके सादर होणार आहेत.

हेही वाचा - सावधान !  थकबाकीसाठी हा टॉवर  होणार सील... -

२५ जानेवारी पर्यंत नाव नोंदणी

स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यासह, सांगली, सातारा, सोलापूर, मुंबई, पुणे, बेळगाव आदी भागातून स्पर्धेक सहभागी होणार आहेत. रिक्षा चालकांसाठी लकी ड्रॉ काढण्यात येणार असून त्यातील विजेत्या चालकांना गणवेशचे कापड भेट देण्यात येणार आहे. तसेच कुशिरे (ता. पन्हाळा) येथील अनाथ मुलांना गणवेशाचे वाटप केले जाणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी २५ जानेवारी पर्यंत नाव नोंदणी बंधनकारक आहे. यावेळी रितेश जाधव, सुनील मगदूम, किरण राऊत, राजू कापूसकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Kolhapur