esakal | ....अन्यथा स्वाभिमानी संघटनेच्या पद्धतीने धडा शिकवू
sakal

बोलून बातमी शोधा

State President of Swabhimani Transport Association Tanaji Sathe statement was handed over to Assistant Inspector of Police Somnath Wagh

गावात प्रशासनाचा जनता कर्फ्यु सुरू आहे. मात्र

....अन्यथा स्वाभिमानी संघटनेच्या पद्धतीने धडा शिकवू

sakal_logo
By
विजय लोहार

नेर्ले (सांगली) : नेर्ले तील मटका व दारू विक्री सह अवैध धंदे बंद करा.अन्यथा स्वाभिमानी संघटनेच्या पद्धतीने धडा शिकवू असा इशारा स्वाभिमानी वाहतूक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी साठे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ याना निवेदन देण्यात आले आहे.


निवेदनात नेर्ले गावात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहे. गावात प्रशासनाचा जनता कर्फ्यु सुरू आहे. व्यापारी,शेतकरी,दुकानदार यांची साथ आहे.परंतु गावात उघडपणे मटका सुरू आहे .तसेच चोरट्या पद्धतीने दारू विक्री होत आहे.काही हॉटेल राजकीय वरदहस्ताने सुरू आहेत.दारू व मटका विक्री होते.सामान्य माणसानी बंद पाळला आहे. दारु, मटका घेणारे एकत्र येत आहेत.त्यांना यातून सूट का?असा सवाल करण्यात आला आहे.याबाबत चे सर्व व्हिडीओ व पुरावे आमच्याकडे आहेत.

हेही वाचा- गरज सह्याद्रीच्या कणखरतेची -

 कोरोनाच्या काळात तरी लोकांच्या जीवाशी खेळू नये.राजकीय व्यक्तींनी हस्तक्षेप टाळावा. लवकर कारवाई न झाल्यास अवैध धंदे  करणाऱ्याना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पद्धतीने धडा शिकवू .गावात अवैध धंदे जोरदार सुरू आहेत.आपले राजकीय हित जोपासले जात आहे. यातून समाजाचे नुकसान होत आहे.निवेदनावर स्वाभिमानी वाहतुकीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक बल्लाळ,वाळवा  तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील,संतोष शेळके यांच्या सह्या आहेत.


नेर्ले गावातील 'तो'मटका किंग हा  यातील खरा मोठा मासा आहे. त्याच्या विरोधात आवाज उचलल्यास काहींना धमकी  देण्यापर्यंत त्याची मजल गेली आहे. तरुणपिढी बरबाद करणाऱ्या या कार्यकर्त्यास कोणत्या राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त आहे व प्रशासन त्याला का मदत करत आहे? याबद्दल पाठपुरावा जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हा पोलिस प्रमुख याना करणार आहे. 

निलेश साठे, विश्व जण आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य

संपादन - अर्चना बनगे