आणीबाणी' ग्रस्तांची पेन्शन सुरू  करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन...जनता दलाचा इशारा

घनश्‍याम नवाथे
Thursday, 3 September 2020

सांगली-  राज्यात आणीबाणीचे बळी ठरलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना व मृतांच्या वारसांना सुरू केलेली पेन्शन महाविकास आघाडीने रद्द केलीय. राज्यातील सरकार आणीबाणी समर्थक आहे. त्यांनी दिलेले आर्थिक कारण तकलादू आहे. पेन्शन तत्काळ सुरू करावी यासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी दिला. 

ते म्हणाले,""सन 1975 मध्ये तत्कालीन नेत्या इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्यासह हजारो नेते, कार्यकर्त्यांना बेकायदेशीरपणे तुरूंगात डांबले. 19 महिने देशाला वेठीस धरले. आणीबाणीची झळ पोहोचलेल्यांना व कुटुंबियांना पेन्शन मिळावी यासाठी अनेक वर्षे मागणी होती. देवेंद्र फडणवीस सरकारने पेन्शन लागू केल्यानंतर आणीबाणीग्रस्त, मृतांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला. महाविकास आघाडीने डिसेंबर 2019 नंतर पेन्शन रद्द केली. आर्थिक अडचणीचे कारण दिले ते तकलादू आहे.'' 

ते म्हणाले,""आणीबाणीग्रस्तांची पेन्शन बंद करणारे सरकार आणीबाणी समर्थक आहे. केंद्रात मोदी सरकारच्या काळात लोकशाही धोक्‍यात आल्याची ओरड करणाऱ्या सोनिया गांधींनी त्यांच्या पक्षाने 45 वर्षापूर्वी आणीबाणी लादल्यामुळे जनतेचे हाल झाले, त्याबद्दल माफी मागावी. राज्य सरकारला आणीबाणीग्रस्तांची पेन्शन सुरू करण्याबाबत आदेश द्यावेत. पेन्शन सुरू व्हावी यासाठी आणीबाणीग्रस्त व मृतांचे वारसदार यांना संघटीत करून आंदोलन केले जाईल.'' 
ऍड. के. डी. शिंदे, शशिकांत गायकवाड, विलास आपटे, सुभाष कुलकर्णी उपस्थित होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State-wide agitation to start emergency pension for victims : Janata Dal's warning