esakal | गोष्ट डॉक्‍टर होऊ न शकलेल्या रुमालवाल्याची ...
sakal

बोलून बातमी शोधा

story of Handkerchief seller who could not become doctor

येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर एक रुमाल विक्रेत्याने आपला छोटा व्यवसाय थाटलाय. गेली काही महिने तो येथे दररोज येतो आणि त्याचा एक हक्काचा ग्राहकवर्ग तयार झालाय. रहिमान मकानदार असं त्याचं नाव.

गोष्ट डॉक्‍टर होऊ न शकलेल्या रुमालवाल्याची ...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर एक रुमाल विक्रेत्याने आपला छोटा व्यवसाय थाटलाय. गेली काही महिने तो येथे दररोज येतो आणि त्याचा एक हक्काचा ग्राहकवर्ग तयार झालाय. रहिमान मकानदार असं त्याचं नाव. ते वैद्य होणार होते मात्र गरिबीमुळे त्यांना पदवीची दोन वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले आणि आता त्यांनी रुमाल विक्री सुरू केली आहे. ते रुमाल त्यांनी स्वतःच तयार केले आहेत. 

रहिमान यांचे गाव इचलकरंजी. ते शाळेतील हुशार विद्यार्थी. वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेशही मिळाला. कर्नाटकातील एका आयुर्वेद महाविद्यालयात ते शिकत होते. दोन वर्षे ओढताण करून ते शिकले, मात्र तिसऱ्या वर्षी वडिलांचा हात चालेना. शिक्षण अर्धवट सोडावे लागले. डॉक्‍टर होण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले. मग त्यांनी रुमाल विक्री सुरू केली. त्यांच्या घरीच हे रुमाल तयार होतात आणि असे सतरा लोक दररोज दुचाकीवर रुमाल विक्री करतात. त्याची आता साखळीच तयार झालीय. 

आणि आता काम करायचे ठरवून ते बाजारात उतरले. दोन हजाराचे रुमाल खरेदी करून सुरवात केली. पुढे या व्यवसायात तेजी असल्याचे लक्षात आले. स्वतः रुमाल तयार करण्याचे ठरवले. वडील खाजाशा मकानदार यांनी त्याला संमती दिली. छोटे युनिट घरातच सुरू झाले. त्यावर फक्त रुमाल तयार होतात. ते कुठेही बाहेर देण्याऐवजी मकानदार परिवाराने आपले नातेवाईक, मित्र जमवले आणि सतरा लोकांची टीम केली. दररोज हे सतरा लोक सातारा, कऱ्हाड, कोल्हापूर, जयसिंगपूर, आष्टा, इस्लामपूर या ठिकाणी जातात. दुचाकी हे शोरूम. प्रत्येकाचा चौक निश्‍चित आहे. त्यामुळे ग्राहकवर्ग तयार झाला आहे. प्रत्येक जण दररोज सरासरी 20 डझन रुमालाची विक्री करतो. 

स्वतः निर्मिती करीत असल्याने टक्केवारी, दलाली द्यावी लागत नाही. दुकानगाळ्याचे भाडे, लाईटबिल, पाणीपट्टीची झगझग नाही. त्यामुळे अन्य विक्रेत्यांच्या तुलनेत कमी किमतीत चांगले रुमाल विकणे परवडते. 25 ला एक अन्‌ शंभरला सहा अशी किरकोळ विक्री असते. लोक अर्धा डझनात खरेदी करतात. त्याचा फायदा होतो. दररोज सतरा लोक दररोज किमान अडीचशे ते तीनशे डझन रुमालांची विक्री करतात. ऑनलाईन पेमेंटचीही त्यांच्याकडे सोय आहे. 

loading image