गोष्ट एका "पॉझिटिव्ह' मुलीची 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

आधी तिच्या कुटुंबातील दोघांना कोरोनाची बाधा झाली. काही दिवसांनी इतरांची तपासणी केली. त्यात तिही कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. वय वर्षे दहा फक्त... ती घाबरली नाही, बिथरली नाही.

सांगली ः भलेभले घाबरून गेलेत. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर कित्येकांच्या पायाखालची वाळू सरकते आहे. आता कसं होणार, काय होणार, या भितीने भलेभले गांगारून गेलेले दिसत आहेत. अशावेळी मिरज तालुक्‍यातील एका मुलीच्या "पॉझिटिव्ह' विचाराची चर्चा आहे. ही मुलगी कोरोना बाधित आहे, मात्र ती दररोज पेपर सोडवते, गृहपाठ करते आणि वॉट्‌सअप ग्रुपर शेअरही करते. ती प्राथमिक शाळेत शिकते. 

आधी तिच्या कुटुंबातील दोघांना कोरोनाची बाधा झाली. काही दिवसांनी इतरांची तपासणी केली. त्यात तिही कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. वय वर्षे दहा फक्त... ती घाबरली नाही, बिथरली नाही. ना रडली, ना तिने कसले टेन्शन घेतले. उलट तिने घरी उपचार सुरु झाल्यानंतर त्याच नेटाने अभ्यास सुरु ठेवला आणि तिने ऑनलाईन पेपर सोडवले, वहीवर अभ्यास लिहला आणि तो शिक्षक-विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर शेअर केला. तिने अभ्यास आणि पेपर शेअर केल्यानंतर तिच्या या पॉझिटिव्ह विचारांची चर्चा सुरु झाली. कोरोना बाधित असताना या मुलीने दाखवलेला सकारात्मक विचार महत्वाचा आहे. तिने स्वतःला अभ्यासात गुंतवून घेतले. पेपर सोडवले. नवनवी माहिती वहीवर उतरवून काढली. 

तिच्या वडिलांशी याविषयी मोबाईलवर संवाद साधला. ते म्हणाले, ""आम्ही घरी आयसोलेटेड आहोत. इथेच उपचार सुरु आहेत. घरी आम्ही तणावाचे वातावरण ठेवलेच नाही. नेहमीसारखे आहे. फक्त बाहेरची कुणी येत नाही, आम्ही कुठे जात नाही. मुलांचा अभ्यास तेवढा आनंदाने सुरु आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The story of a "positive" girl