
सांगली : दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा संचालनात राज्य मंडळाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी या परीक्षेत जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना स्वतः लक्ष घालण्याच्या सूचना केल्या आहेत. परीक्षेत गैरप्रकार करणारे आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच ज्या केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येथील, अशा केंद्रांची मान्यता पुढील वर्षापासून कायमची रद्द करण्यात येणार आहे.