esakal | ठेवीदारांकडून कागदपत्र जमासाठी झुंबड
sakal

बोलून बातमी शोधा

belgaon

ठेवीदारांकडून कागदपत्र जमासाठी झुंबड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : श्री संग्गोळी रायण्णा अर्बन को-ऑप संस्थेसह भीमांबिका महिला बहुउद्देशीय पतसंस्थेतील ठेवीदार आणि गुंतवणूकदारांकडून १ आठवड्यात सुमारे ५ हजार अर्ज प्रांताधिकारी कार्यालयात आजअखेर (ता.२) जमा झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून अर्ज स्वीकारण्यास सुरु झाले असून, २४ सप्टेंबर अंतिम तारीख आहे. दरम्यान, प्रांताधिकारी कार्यालयात अर्ज घेण्यास सुरु झाल्याचे कळताच ठेवीदारांची गर्दी वाढली आहे.

श्री संग्गोळी रायण्णा अर्बन को-ऑप संस्था आणि भीमांबिका पतसंस्था येथून ठेवींची मुदत संपूनही पैसे परत मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यासाठी संग्गोळी रायण्णा संस्थेच्या विरोधात सहकार खात्याकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयात सुनावणी झाली व प्रांताधिकाऱ्यांना गुंतवणूकदारांकडून तपशिल घेण्याचे आदेश बजाविले आहेत. त्यानुसार एक आठवड्यापासून अर्ज घेण्यास सुरु असून, आतापर्यंत सुमारे पाच हजार अर्ज आल्याची माहिती प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली. अर्ज एकत्रित करून तपशिल न्यायालयात हजर केला जाणार आहे.

२४ ऑगस्टपासून अर्ज स्वीकारण्यास सुरवात झाली असून, २४ सप्टेंबर अखेरची तारीख आहे. या दरम्यान अर्ज जमाबाबत आवाहन गुंतवणूकदारांना केले आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कागदपत्र स्वीकारण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष कार्यान्वीत असून, तेथे कागदपत्रे जमा करण्यातबाबत कळविले आहे. यामुळे पहिल्यांदा गुंतवणुकदार व ठेवीदार यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मागील ४ ते ५ वर्षे पैसे परत मिळविण्यासाठी दिलेल्या न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढ्याला यश मिळत असल्याचे दिसत असल्याने आशा पल्लवीत झाल्या आहेत.

हेही वाचा: बेलवडे, कालवडे, शिरंबेत बिबट्याची दहशत; मशागतीची कामं खोळंबली

संगोळ्ळी रायण्णा संस्थेची मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याची परवानगी मिळावी यासाठी जिल्हा न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर मालमत्तेचा लिलाव करुन त्यातून मिळणारे पैसे ठेवीदारांना परत करण्याचे नियोजन आहे. तसेच भीमांबिका पतसंस्थेची मालमत्ता जप्त करून लिलावाच्या परवानगीसाठी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. बेळगाव प्रांताधिकाऱ्यांना विशेषाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. त्यानुसार प्रांताधिकारी रवी कर्लिंगण्णावर यांनी ठेवीदारांना ठेव आणि बॅंक खात्याच्या प्रत सादर करण्याबाबत आवाहन केले आहे. एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. यामुळे गुंतवणूकदारांची झुंबड प्रांताधिकारी कार्यालयात उडत आहे.

loading image
go to top