तहसीलदारांअभावी अडकले विद्यार्थ्यांचे दाखले

मार्तंडराव बुचुडे
शनिवार, 9 जून 2018

पारनेर - मुलांच्या ऐन प्रवेशाच्या काळातच पारनेर तहसील कार्यालयातून मिळणारे विध्यार्थ्यांसाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले केवळ निवासी नायब तहसीलदार यांची बदली झाल्याने आठ दिवसापासून रखडले आहेत. सध्या 10 वी 12 वीचे निकाल जाहीर झाले आहेत व मुलांना विविध ठिकाणी प्रवेश घ्यावयाचा आहे. अशा वेळी दाखले मिळत नसल्याने पाल्यासह पालकांचाही जीव टांगणीला लागला आहे. 

गेल्या आठ दिवसापूर्वी अनेक वर्षापासून रूजू असलेले निवासी नायब तहसीलदारांची बदली झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडील कार्यभार रितसर दुस-या अधिका-याकडे तातडीने देणे गरजेचे होते. कारण सध्या मुलांच्या प्रवेशाचा काळ आहे. अनेक मुलांना विविध ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी विविध दाखल्यांची नितांत गरज असते. परंतु असे झाले नाही 

दरम्यान, त्याचा परिणाम अनेक पालकांचा व मुलांचाही जीव टांगणीला लागला आहे. पालक दररोज कार्यालयात खेटा घालत आहेत. आम्हाला दाखले मिळाले नाहीत तर आमच्या मुलाच्या भविष्याचे काय असा प्रश्न पालकांमधून विचारला जात आहे. आमच्या मुलांचे प्रवेश अटकले किंवा त्याचे नुकसान झाले. तर त्याल जबाबदार कोण या भावणेतून पालकवर्गातून चिड निर्माण झाली आहे. त्यासाठी लवकरात लवकर दाखले मिळण्याची सोय व्हावी अशी मागणी विध्यार्थी पालकांमधून होत आहे.

आज  नायबतहसीलदार काथवटे यांच्या कडे नायब तहसीलदार पदासाह विविध दाखल्यावर सह्या करण्याचे अधिकार देण्यात येत आऐहेत आज ते त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून आहेत आज त्यांना सह्याचे अधिकारव डोंगल मिळणार आहे त्या मुळे ऊद्यापासून दाखले देण्याचे काम सुरळीत होईल-भारती सागरे. तहसीलदार पारनेर.

गेली आठ दिवसात दाखले देणे बाकी असलेल्यांची संख्या
ऊत्पन्नाचे दाखले-1150
रहिवाशी व राष्ट्रीयत्वाचे दाखले-575
शेतकरी असल्याचे दाखले-65
डोंगरी असल्याचे दाखले-08

Web Title: Student certificates stuck due to tehsildars