
खानापूर : गुहागर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर खानापूरनजीक दुचाकी-चारचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक विद्यार्थी जागीच ठार झाला, तर दुसरा जखमी झाला. आयुष रवी धेंडे (वय १७) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सकाळी नऊच्या दरम्यान अपघात झाला. दरम्यान, या मार्गावर एकाच परिसरात आठवड्यात दोन अपघात होऊन दोघे जागीच ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.