esakal | शिक्षणाचा बट्ट्याबोळ; 65 हजार विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित
sakal

बोलून बातमी शोधा

The problem of online education in rural areas is not solved education in gadchiroli

शिक्षणाचा बट्ट्याबोळ; 65 हजार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

sakal_logo
By
विष्णू मोहिते

सांगली : जिल्ह्यात शाळा सुरू झाल्यांच्या पहिल्या दिवसांपासून १५ जूनपासून ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली. गेल्या महिन्यात कोरोनामुळे ‘शाळा बंद पण ऑनलाईन शिक्षण सुरू’ हा उपक्रम शालेय शिक्षण विभागाने सुरू ठेवला. मात्र, अँड्रॉईड मोबाईलशिवाय ऑनलाईन शिक्षण अशक्‍य असून हातावर पोट असणाऱ्यांकडे दूरचित्रवाणीसारखी माध्यमेही नाहीत. यामुळे जिल्ह्यातील २.१५ लाख विद्यार्थ्यांपैकी सुमारे ६५ हजार मुले ऑनलाईन शिक्षणापासून दूरच राहिल्याची बाब समोर आली आहे. आता कोरोनामुक्त गावात ऑफलाईन शाळा सुरू करण्याचा आज पहिला दिवस होता. त्यास किती प्रतिसाद मिळतो हे लवकरच कळेल.

प्राथमिक, माध्यमिक शाळा सुरू होऊन तब्बल एक महिना झाला. गेल्या महिन्यातील ऑनलाईन शिक्षणाच्या आढाव्यात जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्था शिक्षणाच्या कक्षेत असून ३० टक्के विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. राज्य शासनाकडून ऑनलाईन क्षणाशिवाय सह्याद्री वाहिनी, विविध ॲप, ४५ दिवसांचा सेतू अभ्यासक्रम आणि सध्या ‘शाळा बंद शिक्षण सुरू’ बाबतची लिंक दररोज दिली जाते. शिक्षण संचालक ते शिक्षणाधिकारी, तालुका शिक्षणाधिकाऱ्यामार्फत शिक्षकांच्या ग्रुपवरून ही लिंक पालक-विद्यार्थांपर्यंत पोहोचवून त्यांना ऑनलाईच्या प्रवाहात ठेवले जात आहे.

४० टक्के मुलांकडे स्मार्टफोनचा अभाव

पहिली ते बारावीपर्यंतच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ४० ते ४५ टक्के मुलांकडे स्मार्टफोन तथा अँड्रॉईड मोबाईल नाहीत. या पार्श्वभूमीवर कोरोनामुक्त गावांमध्ये ऑफलाईन शाळा सुरू करण्यासंदर्भात संबंधित जिल्हाधिकारी निर्णय घेऊ शकतात, जिल्ह्यात ८ ते १२ वीचे वर्ग आजपासून सुरू करण्याचे आदेश आहेत. त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे महत्त्‍वाचे आहे.

ग्रामीण भागात उणिवा...

ऑनलाईन शिक्षणाबाबत शहरी भागातील पालकांमध्ये जागृती आहे. त्या तुलनेत ग्रामीण भागात जागृती दिसत नाही. मोलमजुरीवर जाणाऱ्या पालकांनी पैसे खर्चून मोबाईल घेतले. ऑनलाईन शिक्षणासाठी महिन्याला नेट पॅक मारावे लागते. ग्रामीण भागात अनेकदा रेंजचा प्रश्‍न येतो. अनेकदा पावसाळ्यात वीज खंडितचे प्रश्‍न निर्माण होतात. पहिली, दुसरीतील मुलांसमवेत पालकांनाच त्यांच्या तासाची काळजी करावी लागतो.

हेही वाचा- कोल्हापुरात दुकाने उघडण्याबाबत आज निर्णय

४५ दिवसांच्या ब्रीज कोर्स

सन २०२१-२२ शैक्षणिक वर्षात पुढील इयत्तेत प्रवेश देण्‍यात आला. गत इयत्तेत विद्यार्थ्यांनी नेमकी कोणती शैक्षणिक मूल्ये आत्‍मसात केली, किती विषयांची पायाभूत मांडणी त्‍यांच्‍या लक्षात आली आहे, याचा आढावा घेतला. त्यात इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्‍या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तो आणखी १५-२० दिवसांत संपणार आहे.

नवी पुस्तके सप्टेंबरमध्येच...

विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. कोरोना साथीमुळे यंदा नवीन पुस्तकांची छपाईला विलंब होत आहे. विद्यार्थ्यांना जुनी पुस्तके शाळेत जमा करून घेतली आहेत. जमा झालेली पुस्तकांचे वाटप झाले आहे. मात्र ती पुरेशी नाहीत. यंदा नवीन पुस्तकांची छपाईला विलंब होत आहे. ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबरमध्येच विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके पडणार आहेत.

कोरोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईनचा लाभ मिळालाच पाहिजे, यासाठी शासन विविध मार्गांचा अवलंब करीत आहे. आमच्याकडील आणि राज्याकडील उपलब्ध आकडेवारीनुसार ७० टक्के मुले सध्या ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. ३० टक्के विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी वैयक्तिक पालकभेटी सुरू आहेत. ब्रीज कोर्सच्या माध्यमातून गेल्या वर्षीच्या वर्गाचे मूल्यमापन सुरू आहे.

- विष्णू कांबळे, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी

० १ ली ते १२ वी- विद्यार्थी संख्या - २.२५ लाख

० झेडपीसह खासगी प्राथमिक शाळा - १६८८

० माध्यमिक शाळा ( सर्व माध्यम) - ७१७

० महानगरपालिका क्षेत्रातील शाळा - ५१

० नगरपालिका क्षेत्रातील शाळा- ३५

स्मार्टफोनचा वापर (टक्के)

० इयत्ता पहिली- १० पेक्षा कमी

० दुसरी- २०

० इयत्ता- ३ री व ४ थी- ३५ ते ४०

० इयत्ता- ५ ते ८ वी- ५५ ते ६०

० आठवी ते १२ वी- ८०

० सरासरी वापर- ७०

loading image