"जेएनयू'तील विद्यार्थी म्हणतात, "आरएसएस' विद्यापीठांना "वॉर झोन' समजते

Students of JNU say RSS considers universities war zones
Students of JNU say RSS considers universities war zones

श्रीरामपूर : ""शिकणे आणि संशोधन करणे, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य नाही. ते विद्यापीठांना "वॉर झोन' समजतात. एखाद्या विषयावर तर्क-वितर्क करणे त्यांना पटत नाही. देशात कोणावर अन्याय होत असेल, तर त्याला वाचा फोडण्याचे काम "जेएनयू'तील विद्यार्थ्यांनी केले. "जेएनयू'मध्ये महिन्यापासून केंद्र सरकारविरोधी आंदोलनाची धग कायम आहे. नुकत्याच झालेल्या हल्ल्यात तेथील तब्बल 30 ते 40 जण गंभीर जखमी झाले. विद्यार्थ्यांसह प्राध्यापिकाही या हल्ल्यात जखमी झाल्या,'' अशी माहिती जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी येथील पत्रकारांशी बोलताना दिली. 

जेएनयू छात्र संघाचे माजी सचिव व आयसाचे राष्ट्रीय महासचिव संदीप सौरभ, जमिया विद्यापीठातील विद्यार्थिनी संघटनेच्या नेत्या चंदा यादव, जेएनयू छात्र संघाच्या माजी अध्यक्ष गीता कुमारी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. "एनआरसी'विरोधात श्रीरामपुरात सुरू असलेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. 

उच्चशिक्षितांच्या आत्महत्या वाढल्या

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""जेएनयू'वरील हल्लेखोरांना सोडून पोलिसांनी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची धरपकड केली. त्यांची चौकशी केली गेली. निर्भया प्रकरण समोर आणण्यात "जेएनयू'च्या विद्यार्थ्यांचा पुढाकार होता. आपल्या मर्जीतील लोकांना वरीष्ठ अधिकारीपदी नियुक्त करण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. पूर्वी देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा मोठा वाटत होता; परंतु आता उद्योजकांसह उच्चशिक्षित तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी कुठलीही पात्रता, निकष लावले जात नाहीत.'' 

सीएएविरोधातील आंदोलनात 26 बळी

गुन्हेगारी प्रवृतीच्या लोकांनी जवळ केले जाते. देशभरात सध्या सरकारविरोधी बोलणाऱ्यांना लक्ष्य करण्यात येते. नागरिकत्व कायद्याविरोधातील (सीएए) आंदोलनात देशभरात 26 जणांचा बळी गेला. पुढील पिढी शिकली, तर सरकारविरुद्ध भूमिका घेतील. त्यामुळे त्यांचे शिक्षण बंद करण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला. 

बिहार येथील राजभवनाला घेराव घालणार

"जेएनयू'चे विद्यार्थी "यंग इंडिया अगेंन्स'च्या माध्यमातून देशातील विविध राज्यात जाऊन जनजागृती करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून अनेक विद्यार्थी सध्या महाराष्ट्रसह बिहारचा दौरा करीत आहेत. 24 फेब्रुवारीला बिहार येथील राजभवनाला घेराव घालणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com