हजारे यांच्या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा

 Students support Hazare's movement
Students support Hazare's movement
Updated on

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मौन आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आज पारनेर येथील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभागी होत पाठिंबा दिला. आंदोलनस्थळी गावकरीही उपस्थित राहून पाठिंबा देत आहेत. 

निर्भया अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा तपास तातडीने करून, त्याबाबतची सुनावणी वेगाने करून निकाल त्वरित द्यावा, महिलांसाठी राष्ट्रीय पातळीवर हेल्पलाइन ठेवावी आदी मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 20 डिसेंबरपासून राळेगणसिद्धीत संत यादवबाबा मंदिरात मौन आंदोलन सुरू केले आहे.

विद्यार्थ्यांकडून घाेषणाबाजी
विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणा देत अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. पारनेर पब्लिक स्कूलचे प्राचार्य गीताराम म्हस्के, दीपक जाधव, अनिकेत औटी, धीरज महांडुळे, राजेंद्र म्हस्के व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक उपस्थित होते. 

अण्णा म्हणाले, की विद्यार्थ्यांमुळे ऊर्जा मिळाली
अण्णांनी विद्यार्थ्यांशी लेखी स्वरूपात संवाद साधला. ते म्हणाले, ""भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसारख्या अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानातूनच या देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यांचे बलिदान आपल्याला विसरून चालणार नाही. त्यांच्या बलिदानाची आठवण नेहमी आपल्या हृदयाशी जोडून ठेवा. मीही आठवणी माझ्या हृदयाशी जोडून ठेवल्यानेच आज समाजासाठी थोडे-फार काही करू शकलो. त्यांचे बलिदान आपल्याला विसरून चालणार नाही. उद्या देश तुम्हीच चालविणार आहात. तुम्ही आज भेटायला आल्यामुळे मला खूप ऊर्जा मिळाली.''  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jayant Patil BJP Entry sangli politics
Kavthemahankal youth missing canal accident
Miraj Kolhapur Jalna ST bus attack latest news
sparrow chick falls from nest
Marathi News Esakal
www.esakal.com