Belgaum : सहा कोटींची मालमत्ता वाचविण्यात यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BELGAUM

सहा कोटींची मालमत्ता वाचविण्यात यश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खानापूर : खानापूर अग्निशामक दलाने जानेवारी २०२० ते ऑक्टोबर २०२१ या काळात आगीच्या ६६ वेगवेगळ्या घटनांमध्ये ६ कोटी ७ लाख २४ हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्याचे कार्य केले आहे. तर सात बचावकार्य करून आठपैकी दोघांना वाचविले आहे.

तालुक्याला मोठे वनक्षेत्र असून दरवर्षी वणव्याच्या घटना घडतात. यात प्रामुख्याने गवळी समाजाच्या झोपड्या आणि ऊस पीक मोठ्या प्रमाणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडते. अलीकडे दरवर्षी पूर येत असल्याने अग्निशमन दलावरील भार वाढला आहे. रुमेवाडीत असलेल्या अग्निशामक दलाच्या कार्यालयात २२ कर्मचाऱ्यांसह दोन सुसज्ज वाहने आहे. या कार्यालयातर्फे शहरासह २१७ खेड्यांना सेवा दिली जाते. अपुऱ्या मनुष्यबळावर ही सेवा दिली जाते.

तालुक्यात २०२० मध्ये आगीच्या ३५ घटना घडल्या. त्यात ३९ लाख ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले तर २ कोटी ४४ लाख ६० हजार ५०० रुपयांची मालमत्ता वाचविण्यात आले. या काळात पाच बचावकार्ये राबविण्यात आली. त्यात सहापैकी एका व्यक्तीला वाचविण्यात यश आले. २०२१ मध्ये आतापर्यंत आगीच्या ३१ घटना घडल्या. त्यात ४ लाख २६ हजार ५०० रुपयांची मालमत्ता भस्मसात झाली तर ३ कोटी ६२ लाख ३ हजार ५०० रुपयांची मालमत्ता वाचविण्यात दलाला यश आले. तसेच दोन बचावकार्यात तिघांमधील एकाचे प्राण वाचविण्यात आले. गेल्या काही वर्षापासून तालुक्यात दर पावसाळ्यात पूर येतो आहे. यावेळी एनडीआरएफ पथक तात्काळ येणे शक्य नसते. त्यावेळी पुरापासून लोकांचे रक्षण करण्याची जबाबदारी अग्निशामक दलावर येऊन पडली आहे. मात्र, त्यांना शासनाकडून पुरेशा बोटी आणि बचावकार्य करण्याचे साहित्य उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण होते.

loading image
go to top