
कुरळप : तुटलेल्या उसानंतर पालापाचोळा पेटवताना लागलेल्या आगीत पंचवीस एकर ऊस जळून खाक झाला. शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याबाबतची माहिती अशी, की येथे जुना मळ्यात उसाचे मोठे क्षेत्र आहे. त्यात अद्याप तोड न मिळालेला आडसालीच्या उसासह खोडवा ऊस आहे. तोड न आल्याने ठिबक ही शेतात जागेवर आहे.