Sangli Farmer : १४ दिवसांचा नियम कागदावरच; उसाच्या एफआरपीसाठी शेतकरी पुन्हा आर्थिक कोंडीत
Sugarcane FRP Payment Delay : गाळप सुरू होऊन ४० दिवस उलटले तरी एफआरपी नाही; कारखान्यांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन, १५ टक्के व्याजासह पैसे देण्याचा आदेश असूनही अंमलबजावणी शून्य; शेतकरी अडचणीत
सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला असला, तरी बहुतांश कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी (किमान आधारभूत दर) वेळेत देत नसल्याचे चित्र आहे.