'या' साखर कारखान्यांची FRP 3900 पार, कर्नाटकात प्रतिटन दर जाहीर; महाराष्ट्रात कधी जाहीर होणार दर?

Karnataka Sugar Factories : यंदाच्या हंगामासाठी साखर कारखान्यांच्या (Sugar Factories) उताऱ्यानुसार प्रतिटन उसाचा दर जाहीर केला आहे.
Karnataka Sugar Factories
Karnataka Sugar Factories esakal
Updated on: 
Summary

केंद्र सरकारच्या (Central Government) सूचनेनुसार राज्य सरकारने गत गाळपातील उताऱ्यानुसार यंदाची एफआरपी जाहीर केली आहे.

चिक्कोडी : यंदाच्या हंगामासाठी साखर कारखान्यांच्या (Sugar Factories) उताऱ्यानुसार प्रतिटन उसाचा दर जाहीर केला आहे. बेळगाव जिल्ह्यात निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ येथील व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट, कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी शुगर्स, बेळगाव तालुक्यातील हुदली येथील बेळगाव शुगर्स व बैलहोंगलच्या सोमेश्‍वर कारखान्यांची एफआरपी ३९०० पेक्षा अधिक आहे. सरकारने जाहीर केलेल्या दरात तोडणी व ओढणी वजा करून दर मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com