
कडेगाव : ऊस तोडणी मजूर पुरवतो, असे सांगून येतगाव (ता.कडेगाव) येथील एका वाहन मालकाची एका ऊस तोडणी मुकादमाने सहा लाख १६ हजार ४७० रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. शंकर भगवान यादव (रा. येतगाव) असे फसवणुूक झालेल्या वाहन मालकाचे नाव आहे. तर पूर्या रुपसिंग राठोड (माळवाद, पो. कोनदरी, ता. महागाव, जि. यवतमाळ) असे संशयिताचे नाव असून त्याच्याविरुद्ध कडेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला. ही घटना ३० मार्च २०२४ ते २० फेब्रुवारी २०२५ या दरम्यान येतगाव येथे घडली.