सांगलीत यंदा गळीत हंगामासाठी एक लाख अकरा हजार हेक्टर ऊस उपलब्ध

शामराव गावडे
Thursday, 22 October 2020

कोल्हापूर सातारा जिल्याच्या सीमेवरील वारणा व कृष्णा या कारखान्यांचे ही जिल्यात चांगले गाळप होईल.

नवेखेड (सांगली) :सांगली जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामासाठी एक लाख अकरा हजार हेक्टर क्षेत्रावर गाळपासाठी ऊस उपलब्ध होणार आहे .जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांना जिल्ह्याच्या सीमेवरील दोन अश्या एकूण १४ साखर कारखाना हा ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे गतवर्षीपेक्षा गाळपासाठी उसाची वाढ झाली आहे.कारखान्यांनी सर्व नियम व अटी पाळून गाळप हंगामाची तुतारी केली होती.परंतु गेली आठ ते दहा दिवस झाले कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने हा हंगाम लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.या वर्षी गाळपासाठी जादा ऊस उपलब्ध होणार असल्याने व हंगाम सुरवातीला लांबल्याने त्याचा परिणाम एकूण हंगामावर होईल.

हेही वाचा- शड्डू ठोकणारा लालमातीतला पैलवान राबण्यासाठी काळ्यामातीत -

२०१९ ला आलेला महापूर तसेच नंतर ही झालेला चांगला पाऊस यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली.पर्यायाने ऊस लागवडीत वाढ झाली.तो ऊस २०२० च्या २१ गाळप हंगामासाठी तुटणार आहे.
राजाराम बापू कारखान्याची चार युनिट,तसेच हुतात्मा,क्रांती,विश्वास, क्रांती,मोहनराव शिंदे,निनाईदेवी, दत्तइंडिया,सोनहीरा ,उदगिरी हे कारखाने गाळपासाठी सज्ज आहेत त्याच बरोबर तासगाव कारखाना ही या वर्षी गाळप करेल.तर कोल्हापूर सातारा जिल्याच्या सीमेवरील वारणा व कृष्णा या कारखान्यांचे ही जिल्यात चांगले गाळप होईल.
आडसाली,पूर्वहंगामी,सुरू, खोडवा आशा पद्धतीने जिल्यात एक लाख अकरा हजार हेकटर उसाची गाळपासाठी नोंद आहे.

तालुका निहाय नोंद क्षेत्र असे(हेकटरमध्ये)
मिरज १८६७९ 
वाळवा ३५६५८
शिराळा ८१४५ 
जत ७११ 
कवठेमहांकाळ ४१७६
तासगाव ६९४६
पलूस १३६७९
खानापूर ३९७२ 
आटपाडी १३३०
कडेगाव १८६४७.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugarcane will be available for sifting on an area of ​​one lakh eleven thousand hectares for this year