ब्रेकिंग...मुलाने केला आई-वडिल आणि बहिणीचा खून

jat crime.jpg
jat crime.jpg
Updated on

जत-उमदी (ता. जत) येथे जमीनीच्या वादातून मुलानेच आई, वडील, बहिणीचा कुऱ्हाडीच्या दांडक्‍याने वार करून खून केल्याने जत तालुक्‍यासह जिल्हा हादरला आहे. या घटनेची माहिती मिळताच उमदी, जत पोलिस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना सकाळी 10 च्या सुमारस घडली. घटनास्थळी मोठ्या संख्येने गर्दी झालेली होती. संशयीत आरोपी घटनेनंतर पोलिस ठाण्यात हजर झाला. 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, उमदी येथे गुरूलिंगप्पा अन्नाप्पा अरकेरी हे आपल्या कुटूंबासोबत राहत होते. या कुटूंबात त्यांची पत्नी नागवा गुरूलिंगप्पा अरकेरी, मुलगा सिध्दपा गुरूलिंगप्पा अरकेरी, व बहिण समुद्राबाई बिरादर राहत होते. गुरूलिंगप्पा व मुलगा सिध्दप्पा यांच्यामध्ये जमीनीच्या वादातून वारंवार वादावादी झाली आहे. बुधवारी सकाळी पुन्हा यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली. या वादावादीमध्ये संशयीत आरोपी मुलगा सिध्दापा अरकेरी (वय 58) याने वडिल गुरूलिंगप्पा अन्नाप्पा अरकेरी (वय 82) आई नागवा अरकेरी (वय 75) बहिण समुद्राबाई बिरादर (वय 62) या तिघांचा कुऱ्हाडीने अंगावर वार करून खून केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mahayuti Under Strain? Satara-Sangli Election Turns Into a Political Test
Former MP Sanjay Patil joins BJP in June 2026
Satej Patil Supports Farmers in Sangli
Fugitive Interception Slabs: LCB Executes Intelligence Raid Inside Karnataka Border Limits
Marathi News Esakal
www.esakal.com