बेळगावला होणार 15 हजार कोरोना लसींचा पुरवठा- बसवराज बोम्मई

बेळगावला होणार 15 हजार कोरोना लसींचा पुरवठा-  बसवराज बोम्मई
Updated on

बेळगाव : बेळगाव जिल्ह्‍यास दररोज १५ हजार अतिरिक्त लसींचा पुरवठा करण्यात येणार आहे. शिवाय दररोज ४० हजार जणांना लस देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पीकहानीसह घरांचा सर्व्हे करून अहवाल द्यावा, अश्या सूचना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना दिल्या. मुख्यमंत्री शनिवारी (ता. २१) बेळगाव दौऱ्यावर आले असता येथील सुवर्ण सौधमध्ये झालेल्या विकास आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यासाठी एक कोटी लशींची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली असल्‍याचे यावेळी बोम्मई यांनी सांगितले. लसींची कमतरता भासू नये, यादृष्टीने आवश्यक सुविधांची व्यवस्था करावी. राज्यात कोविडवर नियंत्रण मिळवण्यात सरकार यशस्‍वी ठरले आहे. तर बेळगाव जिल्ह्यातही पॉझिटिव्हीटी दर कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात बेळगावसह गोकाक, चिकोडी, सौंदत्तीसह एकूण १० ठिकाणी ऑक्सिजन उत्पादन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. येत्या २० दिवसांत सर्व केंद्रांची कामे पूर्ण होणार आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिली.

बेळगावला होणार 15 हजार कोरोना लसींचा पुरवठा-  बसवराज बोम्मई
गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा; संभाजीराजे भडकले

पुरपरिस्थिती बाबत सर्व्हे सुरू असून पीकहानी आणि पडझड झालेल्या घरांचे सर्व्हे काम लवकर पूर्ण करून अहवाल पाठवण्याची सुचना जिल्हाधिकाऱ्यांना केली असल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, खासदार मंगल अंगडी, राज्यसभा सदस्य इराण्णा अंगडी, विधान परिषदेचे मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com