
सांगली : इन्साफ फाऊंडेशन, डु ऑर डाय संस्था आणि आभाळमाया फाऊंडेशनतर्फे पररराज्यासह अन्य जिल्ह्यातील अडकलेल्या लोकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. सुमारे सहाशे जणांना दररोज भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे.
कोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रात झपाट्याने वाढू लागला आहे. सांगली जिल्ह्यात 26 कोरोनाग्रस्त रुग्ण झाले. त्यातील 25 जण कोरोनामुक्त झाले असले तरी धोका टळलेला नाही, यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. तसेच अन्य जिल्ह्यात अथवा राज्यात जाणाऱ्या सीमा भाग लॉक करण्यात आल्या आहेत. जेणेकरून एकही नागरिक जिल्हातून बाहेर जावू शकत नाही. लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे पररराज्यासह अन्य जिल्ह्यातील अनेक कामगार सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात अडकले आहेत. अशा व्यक्तींनी निवारा केंद्रामध्ये आसरा घेतला आहे. त्यांना नाष्टा, जेवणासह सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे.
डु ऑर डायचे प्रवीण शेट्टी म्हणाले,""कुपवाडमध्ये तमिळनाडूसह अन्य राज्यातील 624 प्रशिक्षणार्थी कामगार अडकले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याठिकाणी तातडीने जावून आम्ही दररोज त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. त्यांच्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे.''
"इन्साफ'चे मुस्तफा मुजावर म्हणाले,""जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांसह स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही नाष्टाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 150 जणांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे.'' या मोहिमेत निखिल शिंदे, वंदना काळेल, रहमत मुजावर, सरिता हजारे, गिरीश शहा, पवन मनगुळे, प्रदीप कांबळे, विनोद माने, मंगेश बोबडे, सुनील तावरे, सतीष सोमाणी, नंदकिशोर मालाणी सहभागी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.