Teacher Eligibility Test
esakal
सोलापूर : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांना दोन वर्षांत (३१ ऑगस्ट २०२७ पूर्वी) ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार शिक्षकांना न्यायालयाने (Supreme Court) दिलेली मुदत संपेपर्यंत सहावेळा पात्रता परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.