

Crop Loss and Reduced Ginger
sakal
कडेगाव : ‘‘यंदा कोणत्याही परिस्थितीत आले पिकाची जुने-नवे प्रतवारी नावाखाली कपात, अशी फसवी नाटके चालणार नाहीत. शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेल्या आल्याला चांगला दर मिळालाच पाहिजे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना माजी खासदर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल,’’ असा इशारा स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.