प्रतीकात्मक डॉक्‍टराचें  बाळंतपण करून आंदोलन ः वाचा कुठे 

गजानन बाबर 
Saturday, 11 July 2020

विटा (सांगली) ः येथील ग्रामिण रूग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरूध्द प्रहार जनशक्ती पक्षाचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग व पुढील टप्पा म्हणून आज रक्तदान शिबिर व प्रतीकात्मक डॉक्‍टरांचे बाळंतपण या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. 

विटा (सांगली) ः येथील ग्रामिण रूग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरूध्द प्रहार जनशक्ती पक्षाचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग व पुढील टप्पा म्हणून आज रक्तदान शिबिर व प्रतीकात्मक डॉक्‍टरांचे बाळंतपण या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. 

ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ हे रुग्णालयात आलेल्या सर्वसामान्य, गरीब रुग्णांना योग्य पद्धतीने उपचार करण्याऐवजी आपल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देतात व गरजू रूग्णांची आर्थिक लूट केली जाते. हे सर्व थांबावे आणि गरिबांना न्याय मिळावा,योग्य उपचार केले जावेत.या मागणीसाठी गेले तीन दिवस जनशक्तीच्या वतीने तहसील कार्यालयाच्या बाहेरील आवारात धरणे आंदोलन सुरू आहे. 

डॉक्‍टरांचे बाळंतपण करण्याचा व निषेधात्मक रक्तदान आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिल्याप्रमाणे आज डॉक्‍टरांच्या पुतळ्याचे बाळंतपण करण्यात आले. तसेच गोर गरीबांचे रक्त पिणाऱ्या डॉक्‍टरांचा निषेध म्हणून आज रक्तदान करण्यात आले.

गोरगरीबांचे रक्त पिताय तर आमचेही रक्त प्या म्हणून तब्बल 35 सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्कप्रमुख दत्तकुमार खंडागळे,जिल्हाध्यक्ष सुनिल सुतार,सागर गोतपागर,डॉ.मयुर गायकवाड,गणेश कदम यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन ः अमोल गुरव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Symbolic Doctor's Childbirth Movement: Read Where

Tags
टॉपिकस
Topic Tags: