esakal | तहसीलदारबाईंनी ड्रायव्हरला मारलं... त्या म्हणतात ही तर नौटंकी
sakal

बोलून बातमी शोधा

Tahsildarbhai hits driver ... Video goes viral

औटी सार्वजनिक बांधकाम विभागात चालक आहेत. मात्र, तहसीलदार देवरे यांनी बांधकाम विभागाचे वाहन अधिग्रहीत केल्याने औटी तहसीलदारांच्या सोबत असतात. औटी यांनी, "मला तहसीलदार देवरे यांनी मारहाण केली,' असे सांगतानाच एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यांनी पोलिसांत तशी तक्रार दिली आहे. तहसीलदारांनी धमकी दिल्याचेही त्यात म्हटले आहे. 

तहसीलदारबाईंनी ड्रायव्हरला मारलं... त्या म्हणतात ही तर नौटंकी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पारनेर - तहसीलदार ज्योती देवरे यांनी काल (शुक्रवारी) सायंकाळी मारहाण केल्याची लेखी तक्रार बांधकाम विभागात चालक असलेल्या आबा रावसाहेब औटी यांनी पारनेर पोलिसांत दिली आहे. तहसीलदार देवरे यांनी मात्र, "असे काही घडलेच नाही, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असावे,' असे "सकाळ'ला सांगितले. 

हेही वाचा - विजांच्या कडकडाटासह कर्जतमध्ये पाऊस

औटी सार्वजनिक बांधकाम विभागात चालक आहेत. मात्र, तहसीलदार देवरे यांनी बांधकाम विभागाचे वाहन अधिग्रहीत केल्याने औटी तहसीलदारांच्या सोबत असतात. औटी यांनी, "मला तहसीलदार देवरे यांनी मारहाण केली,' असे सांगतानाच एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यांनी पोलिसांत तशी तक्रार दिली आहे. तहसीलदारांनी धमकी दिल्याचेही त्यात म्हटले आहे. 

दरम्यान, तहसीलदार देवरे "सकाळ'शी बोलताना म्हणाल्या, ""औटी माझ्याबरोबर चालक होते. ते नेहमी "मला कोरोना होईल' असे म्हणत असत. "मला काम करायचे नाही. मला सोडून द्या' असेही म्हणत असत. ते शुक्रवारी "मी जीवच देतो' असे म्हणाले. त्यामुळे मी त्यांना सोडून दिले होते. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असावे, असे मला वाटते. ते ज्या घरात राहत होते, त्या घरमालकानेही त्यांना खोली रिकामी करण्यास सांगितले होते. कुणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी हे नाटक केले असावे.''