Sangli News: होड्यांच्या शर्यतीत ‘तरुण मराठा’ संघाची बाजी; शर्यती पाहण्यासाठी कृष्णा नदीकाठच्या दोन्ही बाजूला मोठी गर्दी

Spectacle on the Krishna River: स्पर्धेत १२ संघांनी सहभाग घेतला. अत्यंत चुरशीने झालेल्या या शर्यतीचे संयोजन शांतिनाथ कर्वे मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते. शर्यती पाहण्यासाठी कृष्णा नदीकाठच्या दोन्ही बाजूला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
“Tarun Maratha team celebrates their victory in the traditional boat race as thousands watch from both banks of the Krishna River.”
“Tarun Maratha team celebrates their victory in the traditional boat race as thousands watch from both banks of the Krishna River.”Sakal
Updated on

सांगली: येथील संकल्प फाउंडेशनतर्फे आयोजित होड्यांच्या शर्यतीत तरुण मराठा बोट क्लब (अ) संघाने प्रथम क्रमांक मिळवला. कृष्णा नदीकाठावर रविवारी सायंकाळी हजारो नागरिकांनी होड्यांच्या शर्यतीचा थरार अनुभवला. विजेत्या संघाला ३१ हजार रुपये व मानाचे निशाण, चषक देण्यात आले. कसबे डिग्रज बोट क्लबने द्वितीय, तर समडोळी येथील वारणामाई बोट क्लबच्या संघाने तिसरा क्रमांक मिळवला. त्यांना अनुक्रमे २१ हजार व ११ हजार रुपये रोख व मानाचे निशाण, चषक प्रदान करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com