

Tasgaon Election
sakal
तासगाव: तासगाव पालिकेचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने आणि १२ नगरसेविका निवडून जाणार असल्याने राजकीय सक्षम महिलांचा शोध सुरू झाला आहे. खुल्या गटातील जागा वगळता महिला उमेदवार शोधता शोधता नेतेमंडळींची दमछाक होऊ लागली आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल सर्वच पक्षांनी मौन बाळगले आहे.
तासगाव पालिकेत नगराध्यक्ष पद महिला राखीव आहे. शिवाय निवडल्या जाणाऱ्या नगरसेवकांमधून २४ पैकी १२ महिला नगरसेविका असणार आहेत. आपल्या पॅनलमध्ये राजकीयदृष्ट्या सक्षम महिला असाव्यात यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत.