तुम्ही माझी काय इज्जत राखली? अजितदादांच्या नाराजीचे उलटसुलट अर्थ; आमदार सुमनताई, रोहित पाटलांचे मौन

अजित पवार यांनी आमदार श्रीमती पाटील यांनी आपल्या गटात यावे, यासाठी प्रयत्न केले होते.
Tasgaon Politics Ajit Pawar
Tasgaon Politics Ajit Pawaresakal
Updated on
Summary

आर. आर. पाटील यांनीही शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम केले, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे.

तासगाव : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांचे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत केल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेली नाराजी राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे. आमदार पाटील विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. त्यांच्या नाराजीचे उलटसुलट अर्थ काढले जाऊ लागले आहेत.

माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील आणि शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार, सुप्रिया सुळे यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या घराला पवारांनी सावरून घेतले. आर. आर. पाटील यांनीही शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम केले, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर आमदार सुमन पाटील (Suman Patil) यांनी शरद पवार गटात राहण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे आबाप्रेमींनी स्वागत केले.

Tasgaon Politics Ajit Pawar
Loksabha Election : महायुती की महाविकास आघाडी? लोकसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टींनी घेतला मोठा निर्णय

‘आर. आर. पाटील हयात असते, तर त्यांनीही हेच केले असते,’ अशा प्रतिक्रिया त्या वेळी ऐकू येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनीही, आमदार श्रीमती पाटील यांनी आपल्या गटात यावे, यासाठी प्रयत्न केले होते. त्यासाठी काही प्रमुख कार्यकर्त्यांना बोलावून घेऊन चर्चाही केली होती. या विषयावर सुरेश पाटील यांच्याशीही चर्चा झाली होती. मात्र आबा घराणे शरद पवार यांच्याशी ठामपणे एकनिष्ठ राहिले.

Tasgaon Politics Ajit Pawar
Ajit Pawar : पुरे झालं पाडायचं, आता लढायचं! निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार गटाची भूमिका

उपमुख्यमंत्री अजित पवार नुकतेच विटा येथे आमदार अनिल बाबर यांच्या निधनानंतर सांत्वनासाठी आले होते. तासगावमार्गे ते सांगलीला कार्यक्रमासाठी जात असताना आमदार गटाच्या कार्यकर्त्यांनी थांबवून त्यांचे स्वागत केले. मात्र अजित पवार यांनी, ‘आता माझे स्वागत करताय, तुम्ही माझी काय इज्जत राखली,’ अशा शब्दांत नाराजी थेट बोलून दाखवली.

अजित पवार यांची आबा घरावरील या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असताना आमदार श्रीमती पाटील अजित पवार गटात गेल्या नाहीत, याबाबत अजित पवार नाराज असणे साहजिक आहे. मात्र या स्वागताच्या घटनेचे उलटसुलट अर्थ काढले जाऊ लागले आहेत.

Tasgaon Politics Ajit Pawar
Uddhav Thackeray : 'शिवसेनेला 2014 च्या निवडणुकीतच संपविण्याचा डाव होता'; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

अजितदादांचे वक्तव्य कार्यकर्त्यांना झोंबले

अजित पवार यांच्या वक्तव्यावर आमदार पाटील अथवा रोहित पाटील यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मात्र आबा घरावरील नाराज अजितदादांचे, ‘आता माझे स्वागत करताय, तुम्ही माझी काय इज्जत राखली,’ हे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना चांगलेच झोंबले आहे, हे मात्र खरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com