Sharad Pawar : सत्तेत नसलो, तरी तुमचा प्रश्न सोडवू

‘बेदाणा आणि द्राक्षाबाबत तुमच्या मागण्या आणि म्हणणे रास्त आहे. राज्यात आणि केंद्रात सत्तेत नसलो, तरी या संदर्भात योग्य त्या ठिकाणी पाठपुरावा करेन, याची खात्री देतो,’
Sharad Pawar
Sharad Pawarsakal

तासगाव - ‘बेदाणा आणि द्राक्षाबाबत तुमच्या मागण्या आणि म्हणणे रास्त आहे. राज्यात आणि केंद्रात सत्तेत नसलो, तरी या संदर्भात योग्य त्या ठिकाणी पाठपुरावा करेन, याची खात्री देतो,’ अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज येथे द्राक्ष-बेदाणा शेतकरी, व्यापाऱ्यांमधील चर्चेला उत्तर दिले.

खासदार शरद पवार यांच्या तासगाव दौऱ्यात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र त्यामध्ये एक कार्यक्रम लक्षवेधी ठरला. शरद पवार यांच्यासमोर बसून बेदाणा व्यापारी, शीतगृहचालक आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. विशेष म्हणजे त्यांनी तासभर अत्यंत शांतपणे नुसत्या ऐकून घेतल्या नाहीत, तर अधूनमधून शंकाही उपस्थित केल्या.

यावेळी आमदार सुमन पाटील, अरुण लाड यांच्यासह रोहित पाटील, बाजार समितीचे सभापती युवराज पाटील प्रमुख उपस्थित होते. शेतकरी बेदाण्यावर १८ टक्के जीएसटी भरत असून हा नाहक भुर्दंड आहे. जगात बेदाणा शेतमाल समजला जातो.

मात्र भारतात तो समजला जात नाही. बेदाणा जीएसटीमुक्त करावा. शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ५० कोटी रुपये जीएसटी भरावा लागत आहे, अशी माहिती बेदाणा व्यापारी अशोक बाफना यांनी देऊन राज्यातील बेदाणा उलाढालीची माहिती दिली.

बेदाणा नियमनात नसल्याने शेतकऱ्यांना सवलती मिळत नाहीत. बेदाणा नियमनात घ्यावा, असे मत जगन्नाथ घणेरे यांनी मांडले.

जीएसटीसाठी ई-वे बिलाची अट १०० किलोमीटर करावी, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार, प्रशांत पाटील, सुदाम माळी यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी बेदाणा पेमेंट ९० दिवसांहून अधिक दिवसांनी मिळते, अशी तक्रारी केल्या.

शीतगृहामध्ये ठेवलेल्या बेदाण्यावरील भाडे दिवसावर ठरवावे, द्राक्षबागायतदारांची प्रतिवर्षी होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रतिबंधक कायदा करावा, मार्केट कमिटीने ऑनलाइन मार्केटिंग सुरू करावे.

बाजार समितीमध्ये जनावराचा बाजार पूर्ववत सुरू करावा अशा मागण्या करण्यात आल्या. बाजार समितीचे सभापती युवराज पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संचालक खंडू पवार यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com