लव्ह के लिए कुछ भी... शिक्षिकेने पटवलं विद्यार्थ्याला अन.. 

The teacher married the student
The teacher married the student

नगर : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं.. असं म्हणतात. प्रेमाला ना जात आडवी येते ना धर्म. त्यात वयाचाही काही विषय येत नाही. काहीजण मात्र, त्याचा बाऊ करून प्रेमाच्या आड येतात. त्यासाठी हत्या किंवा आत्महत्याही करतात. प्रेमात आकंठ बुडालेले युगूल जगाचा विचारच करीत नाही. असाच काहीसा प्रकार कर्जत तालुक्‍यातील एका गावात घडला. 

प्रेमाचा पाठ पढवला
ती त्याच्या शाळेत शिक्षिका होती. आणि तो होता अकरावीला. रोज ती त्याला पुस्तकातील पाठ शिकवायची. क्रमिक पुस्तकातील पाठ शिकवता शिकवता तिने कधी प्रेमाचा पाठ पढवला हे कळलंच नाही. एव्हाना त्यालाही त्या मास्तरीनबाई आवडायला लागल्या होत्या. मग सुरू झाली "एक छोटीसी लव्ह स्टोरी.' व्हायचे तेच झाले.

मास्तरीनबाईंच्या घरीही कळलं

शाळेत, गावात, नातेवाईकांत या लव्हस्टोरीचा बभ्रा झाला. त्या प्रेमवीरांच्या पालकाच्याही कानापर्यंत ही गोष्ट गेली. त्या मास्तरीनबाईंच्या घरीही कळलं. मग उभयतांच्या पालकांनी काही अनुभवाचे बोल त्यांना सुनावले. थोड्या दिवसांसाठी ते लांब राहिले. आगामी बारावीचे वर्ष असल्याने त्यानेही थोडा धीर धरला. परंतु वर्गात येणं-जाणं होतंच. धीर धरील ते प्रेम कसलं. दोघांनाही भेटण्याची ओढ अनावर होई. मग त्यांच्या काळजात उलघाल होतं. 

दूर पळून जावं
प्रेमाच्या आड येणाऱ्या या दुनियेतून आपण दूर पळून जावं, असं त्यांना कित्येकदा वाटलं. तसा प्रयत्नही उभयतांनी करून पाहिला. परंतु दोघांच्याही खांद्यावर जबाबदाऱ्या होत्या. त्यामुळे त्यांनी स्वतःला आवरलं. जबाबदारीच्या ओझ्यानेच मग थोडं सावरलं. पळून जायचं नाही तर थाटामाटात लग्न करायचं, चारचौघांदेखत, देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने एकमेकांचा हात हातात घ्यायचा अशी त्यांनी कसमच खाल्ली. पण त्याचं अठरा वर्ष वय पूर्ण नव्हतं. तसं केलं असतं तर तिला नोकरी गमवावी लागली असती. वरून गुन्हाही दाखल झाला असता. आणि हा बारावीला म्हणजे कमाई शून्य. कामधंदा नसल्याने जगायचेही वांदे. त्याच्या घरची परिस्थितीही बेतास बात. करणार काय? थांबण्याशिवाय इलाजच नव्हता. प्रेमात सर्वात वाईट काय असेल तर ते वाट पाहणं. एकेक दिवस त्यांना डोंगरासारखा भासत होता. त्यांनी कसेबसे दिवस काढले. 

प्रेमाची सत्त्वपरीक्षा उत्तीर्ण
बारावीची परीक्षा झाली, तो उत्तीर्ण झाला आणि दोघांनीही प्रेमाची सत्त्वपरीक्षा उत्तीर्ण केली. तोपर्यंत तो अठरा वर्षांचा झाला होता. त्यामुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. 

आमचा रस्ता मोकळा आहे
दोघांनी पुन्हा आपल्या पालकांना पुन्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ऐकायला तयार नव्हते. तुम्ही परवानगी देणार नसाल तर आम्हाला आता आमचा रस्ता मोकळा आहे, असा इशारा देताच दोघांच्याही पालकांनी माघार घेतली. तसे दोघेही एकाच जातीतील असल्याने फारशी काही अडचण नव्हती. अडचण होती ती वयाची. कारण त्या मास्तरीनबाई होत्या 36 वर्षांच्या. म्हणजे नवऱ्या मुलापेक्षा वयाने दुप्पट. 

लव्हस्टोरीचा हॅपी दी एंड
आम्हा दोघांनाही काही अडचण नाही. मग तुम्ही का अडून बसता, असा दोघांनीही सवाल केला. मग मात्र, घरची मंडळी चिडीचूप झाली. आणि वाजतगाजत त्यांचे लग्न लावून दिले. परवा घडलेल्या या विद्यार्थी-मास्तरीनबाईच्या लग्न सोहळ्याला पै-पाहुण्यांसह पुढारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आशीर्वाद देण्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हतं. अशा प्रकारे झाला एक छोटीशी लव्हस्टोरीचा हॅपी दी एंड.... 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com