कोरोना टेस्टसाठी शिक्षक रांगेत; वाळव्यात दिवसभरात 1 हजार 577 जणांची टेस्ट

दिलीप क्षीरसागर
Sunday, 22 November 2020

विद्यार्थ्यांना शिस्ततीचे धडे शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना आज रांगेत उभा राहून कोरोना टेस्ट करुन घेण्यासाठी साठी सामोरे जावे लागले.

कामेरी (जि. सांगली) ः विद्यार्थ्यांना शिस्ततीचे धडे शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना आज रांगेत उभा राहून कोरोना टेस्ट करुन घेण्यासाठी साठी सामोरे जावे लागले. हे चित्र वाळवा तालुक्‍यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात पाहावयास मिळाले. आज अखेर 1577 जणांची टेस्ट करण्यात आली. यात एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला आहे. 

शासनाने इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबर पासून सुरू केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या समोर उभे राहायच्या पूर्वी व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऍन्टीझेन टेस्ट करून घ्यावयास शासनाने फतवा काढला आहे. याचा अहवाल सर्व सेवकांनी 23 नोव्हेंबर रोजी शाळेत दाखल करावयाचा आहे.

त्यामुळे आज वाळवा तालुक्‍यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, याठिकाणी कर्मचाऱ्यांची कोरना टेस्ट करण्यासाठी गर्दी होती. आज सकाळपासून काही ठिकाणी मोठ्याच्या मोठ्या रांगा लावल्या होत्या. कोरोना टेस्टसाठी आरोग्य केंद्रात गर्दी झाल्याने सेवक वर्ग काही काळ ताण निर्माण झाला होता . विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे देणाऱ्या शिक्षकांना मात्र आज रांगेची शिस्त पाळावी लागली 

एक शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव्ह

शासनाच्या निर्णयानुसार वाळवा तालुक्‍यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरोग्य विभागाच्या मार्फत ऍन्टीझेन टेस्ट ता.18 नोव्हेंबर घेण्याचे काम सुरू असून यात एकूण 1898 पैकी 1577 कर्मचाऱ्यांची टेस्ट करण्यात आली. या एक जण शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव्ह आला आहे. 

- डॉ. साकेत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers queue for corona test; Tests of 1,577 people in Valva Taluka