
इस्लामपूर : येथील तेजस्विनी राजाराम खांबे हिने केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत (यूपीएससी) द्वारे देशात ४७ वा क्रमांक पटकावत यश संपादन केले. तिच्या या यशाने इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्याचे नाव उंचावले आहे. तेजस्विनी यांनी आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.