आटपाडी : ‘टेंभू’च्या पाण्यावर दोन हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेल्या बागेतील आंबा विक्रीसाठी तयार झाला आहे. यंदा आटपाडी तालुक्यातून विक्रमी उत्पादनाची अपेक्षा आहे. टेंभूचे पाणी आल्यामुळे २०१८ पासून आटपाडी तालुक्यात (Atpadi Taluka) शेतकऱ्यांनी (Farmers) केशर आंबा लागवडीचा प्रयोग केला. प्रतिवर्षी नवीन झाडांची थोडी-थोडी लागवड वाढत गेली.