उन्हाचा कडाका! पंधरवड्यात पारा तीन अंशाने वाढला

temperature of summer increased day by day in sangli effect on crop
temperature of summer increased day by day in sangli effect on crop
Updated on: 

सांगली : गेल्या आठवडाभरात पारा दररोज एका अंशाने वाढताना दिसत आहे. होळीनंतर थंडी हद्दपार होऊन कडक उन्हाळ्याला सुरवात होत असते. होळी २८ मार्चला आहे; तत्पूर्वीच उन्हाचा तडाका सुरू झाला आहे.

सकाळी नऊ-साडेनऊपासूनच ऊन तापू लागले आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत गेल्या आठवडाभरात सरासरी ३३ ते ३४ डिग्री तापमान नोंदवले गेले. काल सर्वाधिक म्हणजे ३४ डिग्री तापमान नोंदवले गेले आहे. गेल्या २३ फेब्रुवारीला दुपारची सर्वोच्च तापमान नोंद ३१ डिग्री होती. त्यानंतर पारा वाढतच गेला असून, गेल्या पंधरा दिवसांत दुपारच्या तापमानात सरासरी तीन डिग्रीने वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे द्राक्षातील साखरेचे प्रमाण चांगले वाढले असून ती पिवळसर दिसत आहेत. त्यामुळे भारतीयांची आवड लक्षात सध्याचा काळ द्राक्ष खाण्याचा सर्वोत्तम आहे. इतर पिकांचीही काढणीची कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. शेतकऱ्यांची धांदल सुरू आहे. 

"हा ऋतुबदलाचा काळ आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने, एरवी दररोज अडीच तीन लिटर पाणी घेत असाल; तर त्यात अर्धा ते एक लिटरची वाढ करा. ते क्षारयुक्त असावे. लिंबू-मीठ सरबत वाढवा. उष्माघातापासून बचावासाठी डोकं झाकूनच बाहेर पडा. रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. त्यांना चक्कर येणे, ताप येणे असे त्रास संभवतात."

- डॉ. केशव नकाते

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com