सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेले मंदिर 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 February 2020

मारे सव्वाशे वर्षांचा इतिहास लाभलेले व उत्तर कर्नाटकातील कार्तिक स्वामींची एकमेव मूर्ती असलेले मंदिर म्हणून भोई गल्लीतील कार्तिक स्वामी मंदिराचा उल्लेख करावा लागेल. दरवर्षी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. बेळगाव परिसरातील हे एक प्रसिद्ध मंदिर आहे.

बेळगाव - सुमारे सव्वाशे वर्षांचा इतिहास लाभलेले व उत्तर कर्नाटकातील कार्तिक स्वामींची एकमेव मूर्ती असलेले मंदिर म्हणून भोई गल्लीतील कार्तिक स्वामी मंदिराचा उल्लेख करावा लागेल. दरवर्षी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. बेळगाव परिसरातील हे एक प्रसिद्ध मंदिर आहे.

हे पण वाच - दोन गल्लीच्या गावाला दहा लाखांचे बक्षीस 

सव्वाशे वर्षापूर्वी या ठिकाणी छोटे मंदिर व कार्तिक स्वामींची छोटी मूर्ती होती. श्री कार्तिक स्वामी मंदिर जीर्णोद्धार कमिटी व भोई गल्ली यांच्यातर्फे 1994 साली देणगीदारांच्या सहकार्यातून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. यानंतर पाषाणातील अडीच फुटी मूर्ती बसविली. त्यावेळी सुमारे 25 लाखापर्यंत खर्च आला आहे. अनगोळचे मूर्तीकार श्री. पत्तार यांनी कार्तिक स्वामींची मूर्ती साकारली आहे. श्री बालगणेश उत्सव मंडळ, भोई गल्ली यांचे नेहमीच मंदिराच्या कार्यक्रमांना सहकार्य मिळते. गणेशोत्सवात मंदिर आवारात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी गणेश व कार्तिक स्वामी दोघा भावंडांच्या मूर्तीची पूजा एकाच वेळी केली जाते. कृतिका नक्षत्रावेळी राज्यासह गोवा, महाराष्ट्र येथून भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. कृतिका नक्षत्राच्यावेळी 12 ते 14 तास महिलांसाठी देवाचे दर्शन खुले असते. नागदोष असेल, तर प्रत्येक महिन्याच्या षष्ठीला अभिषेक घातला जातो. यावेळी स्त्री व पुरुषही अभिषेक करू शकतात. 

हे पण वाच - थांबलेली ट्रॉली ठरली त्यांच्यासाठी काळ  

कार्तिक स्वामींचे दर्शन पुरुषांसाठी नेहमी खुले असते. रोज सकाळी 8.30 वाजता, तर दर सोमवारी मंदिरात विशेष पूजा केली जाते. पूजेचे पौरोहित्य भूषण जोशी करतात. ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून रतनकुमार कौजलगी, उपाध्यक्ष विनायक महिलेश्वर, सतीश चव्हाण, प्रवीण महिंद्रकर, उदय चव्हाण, बाबू कोलवेकर, प्रसाद कारेकर, भैय्या चव्हाण, अजित कोकणे, प्रसाद कारेकर, रवी सक्रेन्नवर आदी 13 जण कमिटीत आहेत. तर बालगणेश युवक मंडळाचे अभिजित चव्हाण, सुरेश सुतार यांच्यासह 25 हून अधिक जणांचे कार्यक्रमांसाठी सहकार्य मिळते. 

हे पण वाच - आता बस्स... हिंगणघाट घटनेवरून संभाजीराजे संतापले 
 

मंदिराला सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे. प्रत्येक महिन्याच्या षष्ठीला नागदोष असल्यास अभिषेक घातला जातो. मंदिरात एकमेव मूर्ती असलेले उत्तर कर्नाटकातील एकमेव ठिकाण आहे. 
-रतनकुमार कौजलगी, अध्यक्ष 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: temple has a history of hundreds of years