आता बस्स... हिंगणघाट घटनेवरून संभाजीराजे संतापले 

mp sambhaji raje chhatrapati writing post on Facebook for hinganghat women burn case
mp sambhaji raje chhatrapati writing post on Facebook for hinganghat women burn case

कोल्हापूर - खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी हिंगटघाट येथे घडलेल्या प्राध्यापिका जळीत प्रकरणी तिव्र शब्दांत प्रतिक्रिया नोंदवली आहे. फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी आपल्या भावना तिव्र शब्दात मांडल्या आहेत. माणूसपणाला काळीमा फासणारी घटना. हे वाक्य फार हलकं वाटेल अशी घटना सोमवारी हिंगणघाट येथे घडली.

त्या नराधमाचा एन्काऊंटर करण्याची मागणी लोक करत असतील तर ते समजण्यासारखे आहे. आयुष्याची स्वप्न डोळ्यासमोर असणाऱ्या एका तरुण प्राध्यापिकेला भररस्त्यात जीवंत पेटवलं गेलं. हा क्रुरतेचा कळस झाला. हे जरा अतीच होत आहे. आता बस्स! सहनशीलतेचा कडेलोट होत आहे. अशा भावना खासदार संभाजी राजे यांनी व्यक्त केल्या आहेत. 

संभाजी राजेंनी फेसबुक पोस्ठमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र कोणत्या दिशेला वाटचाल करत आहे? हाच का तो शिवरायांचा स्त्रीविषयक आदर्श डोळ्यासमोर ठेवणारा महाराष्ट्र? हाच का तो शाहू फुले आंबेडकरांचा स्त्री पुरुष समानता ठेवणारा मानवतावादी, पुरोगामी महाराष्ट्र? हाच का तो परस्त्री सदा बहिणी- माया म्हणणारा साधू संतांचा महाराष्ट्र? आज जर महाराज असते, तर ह्या असल्या नराधमाला कोणती शिक्षा केली असती? हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. लोकांना ते समजून जाईल. महाराष्ट्र पोलीसांनी हैद्राबाद पोलीसांचा आदर्श घ्यावा, अशी जनभावना तयार झाली आहे सध्या. याशिवाय अश्या नरधमांच्यावर वचक बसणार नाही. आयुष्यात कुणा माता भगिनी कडे वाईट नजरेने बघण्याचं धाडसच काय, विचार सुद्धा मनात आला नाही पाहिजे. असं काही करण्याची गरज आहे. निर्भया असेल किंवा कोपर्डी च्या भगिनीला आज सुद्धा न्याय मिळलेला नाही. याची खंत आजही मनात आहे.

<

>

काय आहे महाराष्ट्राला सुन्न करणारी हिंगटघाट घटना? 

एकतर्फी प्रेमातून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदोरी चौकात सोमवारी (दि. 3 फेब्रुवारी) एका प्राध्यापिकेला पेट्रोल  जळीत प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या घटनेत प्राध्यापिका तरुणी 40 टक्के होरपळली असून तिच्यावर नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पीडितेची श्वसनलिका भाजली असल्याने तिला श्वास घेण्यात अडथळा निर्माण होत आहे. तिच्या डोळ्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या चेहरा आणि डावा हात मोठ्या प्रमाणात भाजला गेला आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून पुढील 48 तास तिच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. पीडितेच्या श्वसन नलिकेत धूर गेल्याने तिला श्वसनाचा त्रास होत आहे. कृत्रिम नलिका टाकून डॉक्टरांनी तिचा श्वास पुन्हा सुरू केला आहे. पण, अजून धोका टळलेला नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com