esakal | नेवाशातील मशिदीत लपले होते दहा परदेशी नागरिक, स्थानिकांवर गुन्हे दाखल

बोलून बातमी शोधा

Ten foreign nationals were hiding in a mosque in Nevasha

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात जमाव बंदी व संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे पाच किंवा त्यापेक्षाही जास्त नागरिक रस्त्यावर आढळून येत नाहीत. कोणी विनाकारण रस्त्यावर फिरत नाही ना याची पडताळणी पोलिस प्रशासन करीत आहे. त्यासाठी शहरात व गावात विविध ठिकाणी गस्त घालण्याचे काम सुरू आहे. असे असताना काहीजण त्याचे मुद्दाम उल्लंघन करीत आहेत.

नेवाशातील मशिदीत लपले होते दहा परदेशी नागरिक, स्थानिकांवर गुन्हे दाखल

sakal_logo
By
अमित आवारी

नगर : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता नगर शहरात व जिल्ह्यात पोलिस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवला जात आहे. विदेशी नागरिक विदेशातून आलेले नागरिक यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. जामखेडमधील मशिदीत विदेशी नागरिक सापडले होते. यातील दोन विदेशी नागरिक कोरोना पॉझिटिव्ह निघाले. या घटनेला काही दिवस लोटत नाही तोच नेवाशाच्या मशिदीत 10 विदेशी नागरिक काल रात्री सापडले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात जमाव बंदी व संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे पाच किंवा त्यापेक्षाही जास्त नागरिक रस्त्यावर आढळून येत नाहीत. कोणी विनाकारण रस्त्यावर फिरत नाही ना याची पडताळणी पोलिस प्रशासन करीत आहे. त्यासाठी शहरात व गावात विविध ठिकाणी गस्त घालण्याचे काम सुरू आहे.

नेवाशात गस्त घालत असताना पोलिसांना माहिती मिळाली की एका मशिदीत विदेशी नागरिक थांबलेले आहेत. याबाबत पोलिस प्रशासनाला अथवा जिल्हा प्रशासनाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही माहिती मिळताच पोलिसांचे पथक नेवाशातील भालदार (मरकस) मशिदीत गेले. या मशिदीत 10 विदेशी नागरिक आढळून आले. यात जिबुती येथील पाच, बेनिन येथील एक, डेकॉर्ट येथील तीन, घाना येथील एक विदेशी नागरिक आढळून आला. स्थानिकांच्या मदतीने ते लपून बसले होते.

या संदर्भात नेवासे येथील पोलिस कॉन्स्टेबल प्रतापसिंह दहिफळे यांनी भालदार मशिद ट्रस्टचे पठाण जुम्माखान नवाबखान व सलीम बाबुलाल पठाण यांच्याविरोधात नेवासे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या दहा विदेशी नागरिकांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात नेले आहे.

कोणाचा आहे आशीर्वाद

विदेशातील लोकांमुळे भारतात कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची तपासणी केल्याशिवाय भारतात त्यांना सोडले जात नाही. काहीजणांना होम क्वॉरंटाइन राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, काही आखाती देशातून आलेले मशिदीसह इतर प्रार्थना स्थळांमध्ये लपून राहत आहेत. स्थानिक काही नागरिक त्यांना लपवण्याचे गैरकृत्य करीत आहेत. नेवासा, मुकुंदनगर, जामखेड येथे घटना हे त्याचे ताजे उदाहरण आहे.