
Ashta Two Groups Fight Reason : आष्टा येथील उमाजी नाईक हौसिंग सोसायटीत एकमेकांकडे रागाने बघणे व शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. आष्टा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल आहेत. दोन्ही गटांतील सोळा जणांवर गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, परिसरात दंगल नियंत्रण पथकासह आष्टा पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.