
इस्लामपूर : जुन्या भांडणाचा राग मनात धरून बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण आणि साहित्याची मोडतोड केल्याप्रकरणी रेठरे धरण येथील मदन शिवाजी पाटील, ओंकार मदन पाटील (दोघे रेठरे धरण), तसेच मनोज पाटील (मांगले) यांच्यासह अन्य अनोळखी १५ ते २० जणांच्या विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशांत प्रभाकर पाटील (वय ४०, रेठरे धरण) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. आज सकाळी सव्वादहा वाजता म्हसोबा दूध संस्थेत हा प्रकार घडला.