यमगर्णीत वाढतोय वीटभट्टी व्यवसायाचा जोर

अवकाळीची धास्ती; मजुरांची कमतरता
यमगर्णीत वाढतोय वीटभट्टी व्यवसायाचा जोर
Updated on: 

जत्राट : कोरोना, महापूर, अतिवृष्टी गेल्या दोन वर्षापासून मंदावलेला वीटभट्टी व्यवसायाला पुन्हा गती आली असून यमगर्णी परिसरात वीटभट्टी व्यवसायाचा जोर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे या व्यावसायिकांन दिलासा मिळाला असला आहे. मात्र अधूनमधून ढगाळ वातावरण व अवकाळी पाऊस होत असल्याने या व्यावसायिकांतून धास्ती निर्माण झाली आहे. स्थानिक मजूर कागल, कोल्हापूर, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कामासाठी जात असल्याने वीटभट्टी व्यवसायासाठी संकेश्वर, कणगला, हेब्बाळ, गडहिंग्लज भागातून मजूर आणावे लागत आहेत.

यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने हा व्यवसाय जोमात सुरु आहे. येथे तयार झालेला माल निपाणी तालुक्यातील विविध ठिकाणी पाठविला जात आहे. या भागात 1995 पासून लहान-मोठे व्यवसायिक हा व्यवसाय करत आहेत. मध्यंतरी अतिवृष्टी, महापुरामुळे या व्यवसायिकांचे जास्त नुकसान झाले आहे. या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल हिडकल डॅम, सुरुपली, कुरुपलीसह विविध ठिकाणाहून आणला जात आहे. काही व्यवसायिकांची वाहतुकीची सोय नसल्याने स्थानिक पातळीवरच तयार झालेल्या विटा पाठवत आहेत. यमगर्णी परिसरात वीटभट्ट्या असल्याने परिसरातील नागरिकांची चांगली सोय झाली आहे.

`कामावर येणारया कामगार जोडीला एक लाखापर्यंत पहिल्यांदा उचल द्यावी लागते. त्यानंतर ते कामावर येतात. काही वेळा विविध कारणासाठी उचल घेऊनही काही मजूर कामाला येत नसल्याने नुकसान सहन करावे लागते. सध्या व्यसायासाठी वातावरण पोषक असले तरी अवकाळीची धास्ती आहे.`

-पांडूरंग कुंभार, वीटभट्टी व्यवसायिक, यमगर्णी

दृष्टीक्षेपात...

  1. एकूण वीटभट्ट्या 7.

  2. एकूण व्यवसायिक 7.

  3. दिवसाकाठी काम करणारे मजूर 50.

  4. 9 इंची ढोकळा विटेचा दर 7 हजार (हजारी).

  5. 6 इंची बाॅक्स विटेचा दर 14 हजार (हजारी).

  6. मातीचा दर 4500 रुपये डंपर.

  7. बगॅसचे दर 2000 रुपये टन.

  8. मशीनवर काम करण्यासाठी 250 रुपये दिवसाकाठी मजुरी.

  9. इतर कामे करणारया मजुरांना 200 रुपये मजुरी.

  10. मजुरांची कमतरता, व्यवसायिकांची कसरत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Sugarcane Price Protest
Why was Gopichand Padalkar’s nomination challenged?
Sujat Ambedkar allegations on voter registration process,
sai paranjpye
Marathi News Esakal
www.esakal.com