
मोहोळ : तिळगुळ घ्या गोडगोड बोला चा संदेश देणारा नवीन वर्षातील पहिली मकर संकांत मंगळवारी आहे. या मकर संक्रांतीच्या सणासाठी तिळगुळ, हळदी-कुंकवाच्या वस्तूसह वाणाचे साहित्य खरेदी साठी रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मोहोळ शहरांसह ग्रामीण भागातील महिलांनी बाजार पेठेत एकच गर्दी केली होती. यंदा प्रत्येक वस्तूच्या दरात वाढ झाल्याने मकर संक्रांतीच्या सणावर महागाईचे सावट असल्याचे चित्र दिसून आले.