सांगली : ‘जनपथ’वर झळकणार शौर्यगाथा

पाच चित्रकारांनी चितारला इतिहास; सांगलीतील ‘कलाविश्‍व’च्या चौघांचा समावेश
sangli
sangli sakal

सांगली : ‘अन्यायासमोर आम्ही नमणार नाही, पाशवी व जुलमी सत्तेला प्रणाम करणार नाही, ती जुलमी सत्ता मला चिरडेल. चिरडो! मी माझे आत्मीक स्वातंत्र्य राखून ठेवेन. हेच एक खरे स्वातंत्र्य. आम्ही निःशस्त्र असू, पण सत्तेचे वटहुकूम मुकाट्याने आम्ही मानणार नाही,’ असे ठणकावून सांगणारे क्रांतिसिंह नाना पाटील(krantisinh nana patil) आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान व योगदान देणारे, समाजासाठी आयुष्य वेचणारे महाराष्ट्रातील काही समाजसेवक आणि क्रांतिकारकांची शौर्यगाथा प्रजासत्ताक दिनी(republic day) दिल्लीच्या ‘जनपथ’वर (delhi janpath)झळकणार आहे. हा इतिहास चितारण्याचा मान महाराष्ट्रातीलच पाच चित्रकारांना मिळाला असून, त्यात सांगलीच्या ‘कलाविश्‍’वच्या चौघांचा समावेश आहे.

sangli
या शूर घराण्यात झाला 'राजमाता जिजाऊं'चा जन्म!

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, दिल्लीतर्फे चित्कारा युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने २५ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान देशभरातील ३०० नामांकित चित्रकरांना घेऊन कलाकुंभ नावाचा राष्ट्रीय आर्टिस्ट कॅम्प आयोजित केला होता. त्याची संकल्पनाच ‘देशसेवेत योगदान देणारे दुर्लक्षित नॅशनल हिरो’ अशी होती. आपापल्या राज्यातील अशा समाजसेवक, क्रांतिकारक, देशभक्तांनी दिलेले योगदान, त्यांचे कर्तृत्व चित्रांच्या माध्यमातून या चित्रकारांना साकारायचं होतं. देशभरातून आलेल्या या नामांकित चित्रकारांनी आपापल्या राज्यातील अशा महान व्यक्तींचा प्रवास कॅनव्हासवर साकारला.

sangli
सोलापूर : जीएसटीचा आकडा ३०० कोटीपेक्षा अधिक होणार

दहा बाय दीड किलोमीटर कॅनव्हास

देशभरातील ३०० चित्रकारांनी तब्बल १० फूट बाय दीड किलोमीटर अशा भव्य कापडावर हा इतिहास चितारला आहे. २६ जानेवारीला (प्रजासत्ताक दिनी) दिल्लीतील ‘जनपथ’वर त्याचे प्रदर्शन होईलच, त्यानंतर वर्षभर विविध राज्यांमधूनही त्याचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

sangli
'पूल बांधला हो, पण पाण्याची वणवण संपणार कधी?' आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर

यांच्या कुंचल्यांची किमया

महाराष्ट्रातून प्राचार्य सुरेंद्र जगताप, चित्रकार अविनाश मोकाशी, चित्रकार बालाजी चव्हाण, प्रा. प्रफुल्ल सुतार आणि प्रा. सत्यजित वरेकर या पाच चित्रकारांना निमंत्रित केले होते. यातील अभिमानाची बाब म्हणजे यातील चार चित्रकार सांगलीच्या कलाविश्व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.प्रा. सत्यजित वरेकर यांनी या भव्य कॅनव्हासवर राजर्षी शाहू महाराज यांचे साक्षरता आणि शेतकऱ्यांविषयीचे कार्य, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणविषयक कार्य, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांचे योगदान, बाबूराव पेंटर यांचे चित्र आणि शिल्पकलेतील योगदान, बहिर्जी नाईक यांचे कार्यकर्तृत्व आपल्या कुंचल्यातून रेखाटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com