‘कारभारी हो... जनतेला सावरा; कोरोनाच्या कहरात तरुणाईची साद

Corona In Children
Corona In Children
Summary

मागील कोरोनाच्या लाटेत शहरात राजकीय संवेदनशीलतेचं वातावरण चांगलंच तापलं होतं, जनता भयभीत होती. तिला आधाराची गरज होती. रुग्णसंख्या तितकीशी न्हवती; पण भीती मोठी होती.

आष्टा (सांगली) : मागील चार महिन्यांपासून तापलेले नगरपालिका निवडणुकीचे (Municipal elections) वातावरण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थंडावले आहे. पुन्हा सदस्यत्वाच्या संधीसाठी सरसावलेले शूर वीर कारभारी घरात स्थिरावले आहेत. पालिका प्रशासन कोरोनाच्या फेऱ्यात सज्ज असताना कारभारी मात्र रस्त्यावर दिसत नाहीत. पालिकेच्या राजकीय सत्ता सारीपाटावर सध्या नीरव शांतता आहे. लोकप्रतिनिधींकडून मदतीची आशा बाळगून असणारा नागरिक कमालीचा नाराज आहे. कोरोना (Corona) प्रतिबंधक उपाययोजनेत कारभारी अपयशी ठरत आहेत. केवळ मताचा जोगवा मागणाऱ्या कारभाऱ्यांच्या प्रति जनतेत कमालीची उदासीनता आहे, तर ‘कारभारी हो...जनतेला सावरा... नाही तर तुमचं आवरा’, असा तरुणाईचा संदेश सोशल मीडियावर (social media) घुमत आहे.

(The message to help everyone in Corona is going viral on social media)

मागील कोरोनाच्या लाटेत शहरात राजकीय संवेदनशीलतेचं वातावरण चांगलंच तापलं होतं, जनता भयभीत होती. तिला आधाराची गरज होती. रुग्णसंख्या तितकीशी न्हवती; पण भीती मोठी होती. हे आव्हान स्वीकारून सत्ताधारी गटाचे नेते वैभव शिंदे यांनी शहरभर प्रभागनिहाय आढावे घेतले, घरोघरी सॅनिटायझर, मास्क, आर्सेनिक गोळ्यांचे वाटप केले. कोरोना पॉझिटिव्ह नागरिकांच्या कुटुंबियांना आधार दिला. त्यातूनच कारभाऱ्यांनीही संधी दवडली नाही. काहींनी आपल्या प्रभागांत गरजूंना धान्याचे वाटप केले, काहींनी यातही उसने राजकीय अवसान साधले. वैभव शिंदे यांच्यासोबत राहत मीच केले असा आभास निर्माण केला. मंत्री पाटील आणि शिंदे गटाच्या एकीने या लाटेवर स्वार होण्याचे काम कारभारी पदाधिकारी स्थानिक नेत्यांच्या मदतीने झाले.

लाट ओसरत असतानाच लॉकडाउन सैल झाले, नगरसेवकांना पालिका निवडणुकीचे डोहाळे लागले. मग कारभारी पायाला भिंगरी बांधून नागरिकांच्या गाठीभेटीसाठी निघाले. पालिकेतील वावर वाढला, अशातच विकास कामांना मंजुरी मिळाली. ही कामे आपल्यालाच प्रभागात कशी करता येतील, यासाठी त्यांच्यात स्पर्धा जुंपली, न्हवे आपापसात खटकेही उडाले. काहींनी तर मित्रांच्या नावे ठेकेदारी स्वीकारली, विकास कामांचे शुभारंभ, उद्‌घाटनांनी पालिका निवडणुकीचे बिगुल वाजू लागले. इच्छुकांनी नेत्यांच्या घरभेटी गळाभेटी सुरू केल्या. मार्चअखेरपर्यंत वातावरणात राजकीय रंग होते.

Corona In Children
सांगली जिल्ह्यात 45 वर्षावरील नागरिकांसाठी 18 हजार लस दाखल

मात्र, एप्रिलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने इच्छुकांच्या राजकीय रंगाचा बेरंग झाला. शहरात एक एक करीत रुग्ण संख्येने दीडशे पार केली. १३ जणांचे मृत्यू झाले. कारभाऱ्यांनी कुलूप बंद होणे पसंत केले. मागील वर्षीसारखे धान्य वाटप नाही; की सॅनिटायझर, मास्क वा गोळ्या नाही. प्रशासन रस्त्यावर उतरले असताना कारभारी रस्त्यावरच नाहीत. वैभव शिंदे यांच्या मदतीने मात्र काहीसा डोलारा सुरू आहे, जनता लसीकरणासाठी रांगेत उभी असताना; कारभारी मोबाईलमधून नातेवाईक कुटुंबांच्या लशीसाठी राजकीय वजन वापरत असतानाचे चित्र आहे.

सोशल मीडियातून ‘माझं शहर.. माझी जबाबदारी’ म्हणणारे कारभारी कोणती जबाबदारी पार पाडीत आहेत, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. ग्रामीण रुग्णालयात अपुऱ्या सुविधा आहेत, तर खासगी दवाखाने मनमानी चार्जेस लावत आहेत. नागरिकांना सांगली-कोल्हापूरशिवाय पर्याय नाही. कोरोना काळात जनता होरपळत असताना कारभारी मात्र कुटुंबात व्यस्त आहेत. पन्नास हजार लोकसंख्येच्या गावासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्यात का? कधी होणार? अशी साद तरुणाई घालीत आहे. पालिका निवडणूक पुढे जाईल, या अविर्भावात असणाऱ्या कारभाऱ्यांनी रस्त्यावर येऊन जनतेला साथ करावी, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

(The message to help everyone in Corona is going viral on social media)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com