साखर संचनालय आता निजलिंगप्पा केंद्रात

शासनाकडून स्थलांतर; कामकाजाला सुरुवात, अधिवेशनानंतर सुवर्णसौधमध्ये
sugar
sugarsakal
Updated on

बेळगाव : गणेशपूर रोड येथील एस. निजलिंगप्पा साखर संशोधन केंद्रात अखेर ऊस विकास व साखर संचनालय कार्यालयाचे स्थलांतर झाले आहे. गेल्या आठवड्यात याबाबतचा आदेश बजाविण्यात आला होता. त्यानुसार कामकाजाला सुरुवात झाली आहे.सुरुवातीला सुवर्णसौधमध्ये या कार्यालयाचे स्थलांतर करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आदेशात सुधारणा करत हिवाळी अधिवेशनापर्यंत निजलिंगप्पा केंद्रात कार्यालय सुरु केले जाईल. त्यानंतर पूर्ण क्षमतेने सुवर्णसौधला कार्यालय हलविले जाईल, असा उल्लेख करण्यात आला आहे. सुवर्णसौधसाठी दीडशे एकर जमीन संपादित करुन बहुमजली इमारत बांधण्यात आली. मात्र, अधिवेशनापलीकडे या वास्तूचा वापरच होत नाही.

माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या कार्यकाळात कार्यालय स्थलांतराबाबत निर्णय घेतला होता. मात्र, घोडे पुढे सरकले नाही. अखेर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बैठक घेतली होती. गेल्या आठवड्यात बेळगाव दौऱ्यात त्यांनी ४ ऑक्टोबरला साखर संचनालय बंगळूरहून बेळगावला हलविले जाईल, अशी घोषणा केली होती. याप्रमाणे कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले, पण, सुवर्णसौधऐवजी एस. निंजलिंगप्पा संशोधन केंद्रामध्ये कार्यालयाचे कामकाज प्राथमिक पातळीवर सुरु झाले आहे. ऊस दर, संशोधन आणि कारखान्यांची थकबाकी आदी विषय या विभागाच्या अखत्यारित येतात. त्यामुळे हे विषय हाताळण्यासाठी कार्यालयाची मदत मिळणार आहे.

त्यातच इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जातो. त्यामुळे विविध कार्यालयांसाठी तेथे जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश एकापाठोपाठ देण्यात येत आहेत. त्यानुसार आतापर्यंत २४ विभागांचे सुवर्णसौधमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. त्यात आता साखर संचनालयाची भर पडली असून १ ऑक्टोबरपासून कामकाज सुरु झाले आहे. येथील निजलिंगप्पा केंद्रातून कामकाज सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com