
कडेगाव : येथील शिवांश कापड दुकानात मालकाला साडीने बांधून घालून सोन्याचे दागिन्यांसह दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांचा अडीच महिन्यांत छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आले. याप्रकरणी मोर्शी (जि. अमरावती) येथील तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.